मुंबई : बुधवारी, १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदान होतंय. यंदा तब्बल ४११९ उमेदवारी रिंगणात आहेत... तसंच, राज्यातील पाचही महत्त्वाच्या पक्षांची ताकद पणाला लागलीय... आणि म्हणूनच पोलिसांचीही जबाबदारी वाढलीय.
राज्यात तब्बल २३३१ मतदान केंद्रांना संवेदनशील तर ६२६ केंद्रं अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेत. महत्त्वाचं म्हणजे, लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक म्हणजे ९७ मतदान केंद्रं असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या निवडणुकीत मात्र एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. एक नजर टाकुयात काही संख्यात्मक आकडेवारीवर...
एकूण मतदार
राज्यातील एकूण मतदारांची संख्या आहे ८,३५,३८,११४... यामध्ये ४,४०,२६,४०१ पुरुष आणि ३९३६३०११ स्त्रिया, ९८४ इतर आणि सेवेतील १,४७,७१८ जणांचा सहभाग आहे.
एकूण मतदारसंघ
राज्यात एकूण २८८ मतदारसंघ आहेत. त्यापैंकी २३४ सामन्य, अनुसूचित जातींसाठी २९ तर अनुसूचित जमातींसाठी २५ मतदारसंघ राखीव ठेवण्यात आलेत.
उमेदवारांची संख्यात्मक आकडेवारी
महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पक्षांचे आणि अपक्ष म्हणून ४११९ उमेदवार मैदानात आहेत. यामध्ये, ३८४३ पुरुष आणि २७६ स्त्रियांचा समावेश आहे.
यापैंकी ८३ मतदारसंघात १६ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत. तर एका मतदारसंघात ३२ पेक्षा जास्त उमेदवार उभे आहेत.
सगळ्यात कमी उमेदवार म्हणजेच ५ उमेदवार अकोला आणि गुहागर मतदार संघात उभे आहेत. तर दक्षिण नांदेडमध्ये सर्वात जास्त म्हणजेच तब्बल ३९ उमेदवार उभे आहेत.
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार
भाजप - २८०
काँग्रेस - २८७
राष्ट्रवादी - २७८
शिवसेना - २८२
मनसे - २१९
बसपा - २६०
सीपीआय - ३४
सीपीएम - १९
इतर नोंदणीकृत राजकीय पक्ष - ७६१
अपक्ष - १६९९
सगळ्यात मोठा विधानसभा मतदारसंघ – चिंचवड (एकूण ४,८३,०८० मतदार)
सर्वात लहान विधानसभा मतदारसंघ – वडाळा (एकूण १,९६,८५९ मतदार)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.