मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात १ हजार ३५६ उमेदवार उतरले आहेत, जय पराजय तर १५ ऑक्टोबर रोजी ठरणार आहे. यात अनेक उमेदवार फक्त करोडपती नाहीत तर अरबपती आहेत. यातील टॉप टू उमेदवार देशातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपमधून आहेत, तिसऱ्या नंबरवर आहेत, समाजवादी पार्टीचे अबू आझमी.
१) भाजपचे मोहित कंबोज
मोहीत कंबोज हे अवघे ३० वर्षांचे आहेत, त्यांच्याकडे ३५३ कोटी रूपयांची संपत्ती आहे, ते महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत, ते भाजपच्या तिकीटावरून मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत.
कंबोज यांनी या आधीही विधानसभेसाठी तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र २००२ मध्ये काशीहून मुंबईत आलेल्या मोहिज कंम्बोज यांनी १२ वर्षात अब्जावधी रूपयांची कमाई केली.
फर्स्ट एअर बी कॉम पास कम्बोज यांनी २००५ मध्ये ज्वेलरी कंपनीची सुरूवात केली, यानंतर रियल इस्टेटचा बिझनस सुरू केला आणि काही दिवसांनी अब्जावधी रूपयांचं साम्राज्य उभं राहिलं. मात्र मोहित यांच्यामते त्यांनी जे काही कमावलं आहे, त्याचा त्यांनी टॅक्स भरलाय.
२) मंगल प्रभात लोढा
भाजपचे उमेदवार मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती १६३.४३ कोटी रूपये जाहीर केली आहे. उच्चभ्रू मलबार हिल भागातून निवडणूक लढवणाऱ्या मंगलप्रभात लोढा यांचं वार्षिक उत्पन्न ३४ कोटी ६६.६४ लाख रूपये आहे.
३) अबू असिम आझमी
अबू आझमी समाजवादी पक्षाचे आमदार आहेत, अबू आझमी यांनी १५६.१ कोटी संपत्ती जाहीर केली आहे, आझमी यांचा ट्रान्सपोर्ट आणि हॉस्पिटॅलिटीचा व्यवसाय आहे, त्यांच्याकडे १२७.५७ कोटी रूपयांची अचल संपत्ती आहे, तर २८.५ कोटी रूपयांची चल संपत्ती आहे, अबू असिम आझमी यांनी यापूर्वी त्यांची संपत्ती १२६ कोटी रूपये असल्याचं सांगितलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.