नवी दिल्ली : आदर्श घोटाळ्य़ात विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण हे तिघे माजी मुख्यमंत्री दोषी असल्याची कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्याचं भाजपनं सांगितलंय. जर हे तिघे दोषी होते तर मग कारवाई का केली नाही असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय.
एका इंग्रजी वृत्तपत्राला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या मुलाखतीचा आधार घेत भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत. आदर्श घोटाळ्यामुळे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे आणि दिवंगत विलासराव देशमुख अडचणीत आले होते.
मी जर या प्रकरणात कारवाई केली असती तर तिघे जण तुरूंगात गेले असते आणि काँग्रेस संपली असती असे शीर्षक या मुलाखतीला देण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.