राज्यात ६४ टक्के मतदान - निवडणूक आयोग

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानात, सुमारे 64 टक्के मतदानाची नोंद झालीय. सहा वाजेपर्यंत 62 टक्क्याच्या आसपास मतदान होईल, असा प्राथमिक अंदाज केंद्रीय निवडणूक आयोगानं व्यक्त केला होता.

Updated: Oct 15, 2014, 11:16 PM IST

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानात, सुमारे 64 टक्के मतदानाची नोंद झालीय. सहा वाजेपर्यंत 62 टक्क्याच्या आसपास मतदान होईल, असा प्राथमिक अंदाज केंद्रीय निवडणूक आयोगानं व्यक्त केला होता.

याचाच अर्थ 2009 च्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालीय. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत 59.50 टक्के एवढं मतदान झालं होतं. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 60.32 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यापेक्षाही आताच्या विधानसभा निवडणुकीत मतदान वाढ झाला आहे.

मतदानाची संपूर्ण टक्केवारी 

जिल्हा सकाळी ११ पर्यंत दुपारी १ पर्यंत  दुपारी ३ पर्यंत  सायंकाळी ६ वाजता   
अहमदनगर १७.८६% ३२.००% ४६.४२% ७०.००%  
अकोला १२.००% २४.००% ३५.००% ५९.००%  
अमरावती १७.००% २८.०५% ४२.५१% ६७.२६%  
औरंगाबाद २१.००% ३२.००% ४३.००% ६७.२६%  
बीड  १९.८४% २४.००% ६०.००% ७०.००%  
भंडारा १५.००% २२.००%   ७०.००%  
बुलडाणा १५.००% २५.००% 38% ६५.००%  
चंद्रपूर  १७.००% २५.००% ४३.२३% ६७.००%  
धुळे १५.३४% ३१.००% ४१.००% ६५.००%  
गडचिरोली  ३२.००% ४५.००% ५५.००% ६९.००%  
गोंदिया १२.००% १९.००% ४८.०२% ७०.००%  
हिंगोली  २४.००% ३९.००% ५३.८७% ६९.००%  
जळगाव १६.००% २५.००% ३९.००% ६०.००%  
जालना २३.१६% ३६.००% ४०.१०% ६०.००%  
कोल्हापूर  २७.२२% ४०.००% ५६.००% ७४.५१%  
लातूर २०.००% ३८.००% ४९.००% ६६.००%  
मुंबई शहर १३.००% २१.००% ३७.००% ४८.४२%  
मुंबई उपनगर १४.००% २६.००% ४१.००% ५२.००%  
नागपूर १३.००% २५.००%   ५८.००%  
नांदेड  २१.११% ३६.००% ४८.००% ६४.०७%  
नंदुरबार १२.००% ३४.००% ४४.००% ६८.००%  
नाशिक १६.२३% २३.००% ३४.००% ६४.२६%  
उस्मानाबाद १९.००% ३५.००% ४९.३६% ६५.२६%  
पालघर १२.००% ३०.००% ४५.००% ६४.००%  
परभणी १९.७०% ३९.००% ५२.१६% ६४.०८%  
पुणे २१.७५% ३४.००% ४५.२९% ६१.६०%  
रायगड १७.२५% २९.३३ ४८.१२% ६९.००%  
रत्नागिरी १४.३०% ३६.००% ४७.०२% ६३.००%  
सांगली  २३.००% ३८.००% ५२.५८% ७२.००%  
सातारा १८.६५% ३५.००% ५०.००% ६७.००%  
सिंधुदुर्ग  १७.२२% ३०.००% ४१.००% ६५.००%  
सोलापूर २२.००% ३६.५१% ४८.५३% ६७.००%  
ठाणे  ११.०४% २१.१९% २८.३३% ५३.००%  
वर्धा  १३.००% ३२.००%   ७०.००%  
वाशिम २२.००% ३०.००% ४०.०५% ६०.००%  
यवतमाळ   १०.३४% ३०.००% ४३.००% ६५.००%  

************

दिग्रजमध्ये मतदान अधिकाऱ्याला मारहाण

दिग्रसमधील वसंतनगर येथे माजी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रत्ना आडे यांनी मतदान अधिका-याला मारहाण केली, आडे यांचा मतदान यंत्राला धक्का लागल्याने निर्माण झाला होता वाद. 16.35 PM

पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक  

गडचिरोली : जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालीय. एटापल्ली भागातील ताडपल्ली गावात दुपारी १२ वाजता ही घटना घडलीय.  

नक्षलवाद्यांकडून गोळीबार पोलिसांवर गोळीबार करण्यात येतोय, या गोळीबाराला पोलिसांनी प्रत्युत्तर दिलंय, सुदैवाने सध्यातरी हानी झाल्याची बातमी नाही.

गडचिरोलीत सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंतच मतदानाची वेळ असते, दुर्गम भाग असल्याने ईव्हीएममशीन वेळेवर, सुरक्षित पोहोचवण्यावर जोर असतो.

गडचिरोलीतील तीन तालुक्यांमध्ये सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत मतदान घेण्यात येतं.

***********************

राष्ट्रवादीचे उमेदवार आर.आर.पाटील यांनी मतदान केलं 15.44 PM

*******************

नागपूरमध्ये मनसे आणि भाजप एकमेकांना भिडले आहेत 15.40 PM

*******************

 विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का दुपारनंतर वधारला असून दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२ टक्के मतदान झाले आहे. 

----------

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हीने मतदानाचा हक्क बजावला, सामान्य मुंबईकरांनी मतदानासाठी बाहेर पडावं,असं यावेळी सोनाली बेंद्रेने म्हटलंय 13:21 PM

Media preview

ड्रीम गर्ल हेमा मालिनी आपल्या कन्येसह मतदानाला आल्या होत्या : 13: 09 PM

Media preview

***********************

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 13.06 PM

 

*****************

ठाणे : जितेंद्र आव्हाड यांनी दुपारी मतदान केलं 12.41 PM

Media preview

*******************

जळगाव : अमळनेर तालुक्यात बोगस मतदानाचे प्रकार घडतायत, फोटोत दिसणाऱ्या व्यक्तींवर बोगस मतदानाचे आरोप आहेत. 12.30 PM

*******************

विक्रोळी शिवसेना-मनसे कार्यकर्ते भिडले 12: 07 PM
विक्रोळी पार्कसाईट भागात शिवसेना मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले असल्याचं सांगण्यात येतंय, सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे, पोलिंग बुथ जवळ हा प्रकार घडल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

...............

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचं मतदान 11.33 AM

Media preview

..................

भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचं मतदान 11.14 AM

Media preview

...................

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मतदान 11.13 AM

 

Media preview

...................

क्रिकेटर सचिन तेंडुलकरचं मतदान 11.08 AM

 

Media preview

...................

भाजप नेते नितिन गडकरींचं मतदान 10.58 AM

 

Media preview

........................

वसईत झोनल ऑफिसरकडे २ ईव्हीएम मशीन सापडल्या, रात्री दोन वाजता मशीन ताब्यात घेण्यात आल्या 10: 53 AM

 

Media preview

...................

मराठी सेलिब्रिटींचं मतदान, अभिनेता अतुल कुलकर्णी, रितेश देशमुख आणि स्वप्निल जोशी 10.51 AM

 

Photo: LIVE UPDATE पाहा मराठी सेलिब्रिटींचं मतदानलिंक http://bit.ly/1EVR3fw

'मैने प्यार किया' चित्रपटानंतर प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री भाग्यश्रीने मतदान केलं 10.35 AM

...................

Media preview

...................

मतदान केंद्रावर वीज कोसळली, पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू  | 10.31 AM UPADTE

नागपूर :  सावनेरमध्ये मतदान केंद्रावर वीज कोसळून पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू  झाला आहे, तर सात जण जखमी झाले आहेत.

 विदर्भात आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने मतदानावर काहीसा परिणाम दिसून येतोय, पण दुपारनंतर पुन्हा मतदानाला जोर येणार असल्याचं सांगण्यात येतं आहे.

जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

...................

माजी मुख्यमंत्री, काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावला 10.16 AM

Media preview

...................

उद्योगपती अनिल अंबानी यांनीही मतदानाचा हक्क बजावला 10.15 AM

Media preview

...................

शरद पवारांनी मुंबईत मतदान केलं 10.05 AM

Media preview

...................

मिस्टर क्लीन अशी ओळख असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदान हक्क बजावला 10.01 AM

Media preview

...................

नागपूर - सावनेरमध्ये एका मतदान केंद्रावर वीज कोसळल्याने 8 मतदार जखमी 09.65 AM

विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस, मतदानावर काहीसा परिणाम 09.55 AM

भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांचं परिवारासह मतदान 09.51 AM

Media preview

...................

निवडणूक आणि मतदानाच्या धामधुमीत लातूरात एकत्र आलेलं देशमुख परिवार 09.50 AM

Media preview

...................

देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आपल्या यांनी मतदानाचा हक्क बजावला 09.38 AM

Media preview

...................

सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांनी केलं मतदान 09.34 AM

Media preview

...................

अभिषेक बच्चन आणि जया बच्चन मतदानाला पोहोचले UPADTE 09.30 AM

Media preview

...................

राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन आहिर यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केलं UPDATE 09.22 AM

Media preview

...................

मतदानानंतर सुप्रिया सुळे यांनी आपल्या परिवारासह असा सेल्फी काढला 09.18 AM

 

Embedded image permalink

...................

श्री कृपाशंकर सिंह आणि आपल्या सौभाग्यवतींसह मतदान केलं, ते काँग्रेसचे उमेदवार आहेत 08.50 AM

Embedded image permalink

...................

अभिनेत्री रेखा यांनी मतदान केलंय, आणि पाहा हा सेल्फी 08.43 AM

Embedded image permalink

...................

 

पाहा पाहा या आजी मतदानाला पोहोचल्या आहेत, तुम्ही कधी करणार मतदान 08.41 AM

Media preview

 

...................

अभिनेत्री रेखा यांनीही मुंबईत मतदान केलं UPDATE 08.36 AM

Embedded image permalink

...................

राष्ट्रवादीचे नेते आणि ज्यांचं राजकीय भवितव्य ठरणार आहे, त्या अजित पवारांनी बारामतीत मतदान केलं 08.24 AM

Media preview

...................

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी कुर्ल्यात मतदान केलं 08.22 AM

Media preview

...................

मतदानाचा असा ओसांडून वाहणारा उत्साह पाहिलाय कधी? 08.20 AM
अविनाश गुन्नेर यांनी मतदान केल्यानंतर त्यांचा सेल्फी झी चोवीस तासच्या ट्वीटरवर पाठवलाय, तुम्हीही तुमचा सेल्फी ट्वीटरवर @zee24taasnews ला ट्वीट करा.

Embedded image permalink

...................

हरियाणातील रोहतकमध्ये एका अपंग मुलीने हक्क बजावला तुम्हीही मतदान करा 08.15 AM

Media preview

...................

पुण्यातील मतदान केंद्रावरील एक दृश्य 08.07 AM

Media preview

 

...................

 

एम जी वैद्य यांचं नागपुरात मतदान 08.04 AM

Media preview

 

...................

 

भाजपचे उमेदवार विनोद तावडे यांचं मुंबईत मतदान 08.01 AM

Media preview

****************

सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांना मतदानाची परवानगी नाही 07.50 AM

जळगाव घरकूल घोटाळ्यातले आरोपी आणि विधानसभेचे उमेदवार सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांना न्यायालयाने मतदानाची परवानगी नाकारली आहे. सुरेश जैन हे शिवसेनेकडून जळगाव शहर मतदारसंघातून, तर गुलाबराव देवकर हे जळगाव ग्रामीण मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत, सध्या जैन आणि देवकर हे धुळे कारागृहात आहेत, त्यांनी मतदानासाठी परवानगी मागितली होती, मात्र नाकारली आहे.

झोनल ऑफिसरच्या घरी दोन इव्हीएम मशीन्स सापडले 07.48 AM
वसईमध्ये एका झोनल ऑफिसरच्या घरी दोन इव्हीएम मशीन्स सापडले आहेत.अशोक मान्द्रे असं या अधिका-याचं नाव आहे. वसईच्या गोलानी परिसरातल्या घरी या मशीन्स सापडल्या.

या दोन्ही इव्हीएम मशीन्स राखीव मशीन्स असल्याची माहिती तहसीलदारांनी दिलीय. नियमानुसार इव्हीएम मशीन्स घरी ठेवता येत नाहीत. त्यामुळे संबंधित अधिका-यावर कारवाई करण्याचं आश्वासन तहसीलदारांनी दिलंय. तर उमेदवार विवेक पंडित यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय. 

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे, ९१ हजार ४२७ मतदान केंद्रावर हे मतदान सुरू आहे. मतदान करण्यासाठी कोणतंही एक सरकार मान्य ओळखपत्र आवश्यक आहे.

रेकॉर्ड ब्रेक मतदान करा 

यंदाच्या वर्षी रेकॉर्डब्रेक मतदान करायचंय, त्यासाठी प्रत्येकाच्या बोटाला शाई लागलीच पाहिजे. मतदारराजा, विसरू नकोस, आजचा दिवस तुझाच आहे.

महाराष्ट्राचा खरा भाग्यविधाता, नवा शिल्पकार तूच असणार आहेस. तुमचं एक एक मत निर्णायक ठरणार आहे.

मंत्रालयातल्या सत्तेच्या चाव्या कुठल्या कारभा-याकडे सोपवायच्या, याचा निर्णय तुम्हालाच घ्यायचाय. तेव्हा मतदारांनो, घराबाहेर पडा. मतदान करा आणि महाराष्ट्र घडवा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.