वर्ल्डकप फिवर संपल्यानंतर बडे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला

वर्ल्डकप फिवरमुळे गेल्या दोन महिन्यांपासून एकही मोठा सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकला नव्हता. मात्र वर्ल्डकप फिवर संपल्याने आता मोठ्या बॅनरचे सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. यात सुशांत राजपूत आणि सनी लियॉनच्या सिनेमांची बोलती आहे.

Updated: Apr 3, 2015, 02:54 PM IST
वर्ल्डकप फिवर संपल्यानंतर बडे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : वर्ल्डकप फिवरमुळे गेल्या दोन महिन्यांपासून एकही मोठा सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकला नव्हता. मात्र वर्ल्डकप फिवर संपल्याने आता मोठ्या बॅनरचे सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. यात सुशांत राजपूत आणि सनी लियॉनच्या सिनेमांची बोलती आहे.

क्रिकेट म्हणजे भारतीयांसाठी जीव की प्राण! त्यामुळे वल्ड कप आयपीएलसारख्या मोठी क्रेझ असलेल्या क्रिकेट मॅचेसचा सीझन आला की ब़लिवूड बॅकफूटवर जाते..यंदाही वर्ल्डकप असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून एकही मोठा सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकला नव्हता. यंदा एप्रिल-मे मध्ये आयपीएल असूनही बॉलिवूड या काळात जवळपास १२०० कोटींचा सट्टा लावला जाण्याची शक्यता आहे. कारण आधीच वर्ल्डकपमुळे सिनेमा प्रदर्शित व्हायला वेळ झालाय त्यातच आयपीएलमुळे अजुन थांबण्याची रिस्क निर्मात्यांना घ्यायची नाही. त्यामुळे फिल्ममेकर्सने हे धाडस करण्याचा निर्णय घेतला आहे.

याची सुरुवात ३ एप्रिलपासून होणार आहे. यशराज बॅनरचा सुशांतसिंग राजपूत स्टार डिटेक्टीव 'ब्योमकेश बक्षी' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. स्वातंत्र्यपूर्व काळातील सिनेमाची कथा असून या थ्रिलर सिनेमात सुशांत सिंग राजपूतचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

१० एप्रिल रोजी सनी लिय़ॉनचा 'एक पहेली लैला' हा म्युझिकल थ्रिलर सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील गाणी हिट झाली असून सनीने सिनेमात अत्यंत मादक दृश्ये दिली आहेत. सिनेमाचं प्रमुख आकर्षण 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमातील ऐश्वर्यावर चित्रीत झालेले 'ढोल बाजे' हे गाणे असून या गाण्यावर सनीने धमाकेदार डान्स केला आहे.

विक्रम भट आणि इम्रान हाश्मी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली असून या जोडीचा 'मि.एक्स' हा सायफाय हॉरर सिनेमा १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. हा एक वेगळ्या धाटणीचा हॉरर ३ डी सिनेमा असणार आहे.

बेबी या सिनेमामुळे अक्षय कुमारकडून अजून अपेक्षा वाढल्या आहेत. त्याचा ग्ब्बर ईज बॅक हा सिनेमा मच अवेटेड सिनेमा १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे..गब्बर या सिनेमाच्या प्रोमोवरुन हा सिनेमाही खरंतर खुपच promising वाटतोय.. बेबी या सिनेमात आपला जबरदस्त performance देऊन  प्रेक्षकांची आणि क्रिटिक्सची अक्षयने भरभरुन दाद मिळविली होती..त्यामुळे त्याच्या गब्बर या सिनेमाकडूनही रसिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत..श्रुती हसनही सिनेमात  प्रमुख भूमिकेत असणार आहे.

शूजित सरकार दिग्दर्शित अमिताभ  बच्चन, दीपिका पदूकोण आणि इरफान खान यांची प्रमुख भूमिका असलेला 'पीकू' हा सिनेमाही लगेचच  ८ मे रोजी आपल्या भेटीला येतोय..  यु ट्युबवर या व्हिडियोला सध्या चांगला प्रतिसाद मिळतोय. वडील मुलीच्या नात्यावर आधारीत 'पीकू'  या सिनेमात अमिताभ बच्चन यांचा पुन्हा एकदा नविन अवतार बघायला मिळणार आहे. 

भारत-पाक मॅच सुरु असतांना रणबीर कपूर अन अनुष्का शर्माच्या बॉम्बे वेल्वेट या बहुप्रतिक्षित सिनेमाचा ट्रेलर लॉच करण्यात आला..यात रणबीर अनुष्काच्या केमिस्ट्री बरोबरच करण जोहरचा खलनायकी अवतार रसिकांना बघायला मिळणार आहे..सिनेमात रणबीर-अनुष्काने तब्बल ७ किसींग दिले असून सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. १९६०च्या दशकातल्या मुंबईच प्रतिबिंब या सिनेमाच्या ट्रेलरमधून दिसतंय.

हिंदीप्रमाणे मराठीतील ही दोन बिग बजेट सिनेमे या दरम्यान प्रदर्शित होणार आहे. टाईमपास हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. आता त्याचा सिक्वेल टाईमपास २१ मे रोजी प्रदर्शित होणार असून सुरुवातीपासूनच सिनेमाची खुप चर्चा आहे..

केदार शिंदेचा अगं बाई अरेच्चा हा सिनेमा सुपर हिट झाला होता..आता केदार तब्बत ११ वर्षांनंतर या सिनेमाचा सिक्वेल घेऊन येत असून २२ मे रोजी हा अगं बाई अरेच्चा २ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे..सा सिनेमामुळे केदार आणि सोनाली कुलकर्णी प्रथमच एकत्र काम करत आहेत. विशेष म्हणजे याच काळात विधू विनोद चोप्रा यांचा हा मह्त्त्वाकाक्षी आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट ब्रोकन हॉर्सेस आणि दानिस तानोविक यांचा टायगर्स हे दोन सिनेमेही भारतात प्रदर्शित होणार आहे. यामुळे ख-या अर्थाने चित्रपट रसिकांसाठी या काळात पर्वणीच असणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.