आता मी व्हर्जिन राहिलो नाही - सिद्धार्थ मल्होत्रा

 बॉलिवूडचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं इंन्स्टाग्रामवर आपला पहिला-वहिला फोटो टाकून आपणंही या सोशल वेबसाईटवर प्रवेश केल्याचं जाहीर केलंय.   

Updated: Apr 3, 2015, 01:08 PM IST

नवी दिल्ली :  बॉलिवूडचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं इंन्स्टाग्रामवर आपला पहिला-वहिला फोटो टाकून आपणंही या सोशल वेबसाईटवर प्रवेश केल्याचं जाहीर केलंय.   

'एक व्हिलन' फेम सिद्धार्थनं जहाजानं प्रवास करत असताना आपला एक सेल्फी इन्टाग्रामवरून आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय. 

याचवेळी, त्यानं आपली व्हर्जिनिटी गमावल्याचंही म्हटलंय. 'ओपनिंग सेल्फी... इन्स्टाग्रामवर आता मी व्हर्जिन राहिलो नाही' अशी सिद्धार्थनं या फोटोखाली कॅप्शन दिलीय. 

Opening selfie...no longer a Instagram Virgin

A photo posted by Sidharth Malhotra (@s1dofficial) on

सिद्धार्थ मल्होत्राचं इन्स्टाग्राम अकाऊंट s1dofficial आहे. सिद्धार्थ सध्या आपल्या कुटुंबासोबत सुट्यांचा वेळ मजा-मस्तीत घालवतोय.  

३० वर्षांचा सिद्धार्थ करण मल्होत्रा दिग्दर्शित 'ब्रदर्स' या सिनेमात लवकरच दिसणार आहे. हा सिनेमा म्हणजे हॉलीवूड फिल्म 'वॉरियर' (२०११) चा रिमेक असेल. या सिनेमात त्याच्यासोबत अक्षय कुमारही दिसणार आहे. याशिवाय, सिद्धार्थकडे 'भावेश जोशी' नावाचा सिनेमाही आहेच.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.