भाग मिल्खा भाग : फरहान धावायला तयार

प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर बनणाऱ्या 'भाग मिल्खा भाग' या सिनेमात फरहान आख्तर मिल्खा सिंग यांची भूमिका साकारत आहे. यासाठी फरहान कसून मेहनत करतोय.

Updated: Feb 24, 2012, 04:34 PM IST

www.24taas.com, चंदिगढ

 

प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर बनणाऱ्या 'भाग मिल्खा भाग' या  सिनेमात फरहान आख्तर मिल्खा सिंग यांची भूमिका साकारत आहे. यासाठी फरहान कसून मेहनत करतोय. फरहानला याविषयी विचारलं असता तो म्हणाला की तो या भूमिकेबाबत अजिबात नर्व्हस नाही.

 

‘रंग दे बसंती’चे दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा हे 'भाग मिल्खा भाग'चं दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात फरहानबरोबर सोनम कपूरही काम करत आहे.

 

फरहान आख्तर म्हणाला, मला मिल्खा सिंग यांची भूमिका साकारायला मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. कारण अशा लोकांवर जास्त सिनेमे बनत नाहीत. मिल्खा सिंगवरील सिनेमा हे एक आव्हान आहे. पण मी या आव्हानाला घाबरत नाही. उलट मी माझ्या भूमिकेबद्दल खूपच एक्साइटेड आहे. मी या भूमिकेसाठी कठोर परिश्रम घेत आहे. माझं संपूर्ण लक्ष याच सिनेमावर आहे. मिल्खा सिंग यांची भूमिका साकारण्यासाठी मला शारीरिक, मानसिक आणि भावनिकरीत्याही स्वतःला तयार करावं लागत आहे.

 

या सिनेमाचं शुटींग अद्याप सुरू झालेलं नाही. फरहानने धावपटू मिल्खासिंग यांची भूमिका साकारण्याचं आव्हान स्वीकारलं तर आहेच, पण यासाठी फरहान नक्की काय प्रशिक्षण घेतोय, याबद्दल मात्र बोलायला तयार नाही.