Gautami Patil : आम्हाला गौतमीसारखाच डान्स हवा... प्रेक्षकांच्या मागणीमुळे तमाशा कलावंतांची वाढली डोकेदुखी

Gautami Patil : 'सबसे कातील गौतमी पाटीलला महाराष्ट्रातल्या तरुणाने अक्षरक्षः डोक्यावर घेतलं आहे. गौतमीच्या कार्यक्रमला उपस्थिती लावण्यासाठी गावाकडील तरुणाई वाटेल तितका प्रवास करत आहेत. मात्र आता आम्हाला गौतमीसारखाच डान्स हवा अशी मागणी सुपारी देणाऱ्यांकडून तमाशा कलावंताकडे केली जात आहे.

आकाश नेटके | Updated: Apr 22, 2023, 11:58 AM IST
Gautami Patil : आम्हाला गौतमीसारखाच डान्स हवा... प्रेक्षकांच्या मागणीमुळे तमाशा कलावंतांची वाढली डोकेदुखी  title=

Gautami Patil : 'सबसे कातील गौतमी पाटील' म्हणत महाराष्ट्रातल्या तरुणाईने लावणी डान्सर गौतमी पाटीलला (Dancer Gautami Patil) अक्षरक्षः डोक्यावर घेतलं आहे. आपल्या अदांनी गौतमी पाटीलने लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच वेड लावलं आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रात सध्या जोरदार मागणी आहे. मात्र गौतमीच्या कार्यक्रमांमुळे पारंपारिक तमाशा (tamasha) आणि लावणीचे (Lavni) कार्यक्रम मागे पडताना दिसत आहेत. यामुळे तमाशा कलावंतावर उपासमारीचीही वेळ आली आहे. गौतमी पाटील जसा डान्स आणि हावभाव करते तसंच तुम्ही देखील करा, अशी मागणी तमाशाची सुपारी घेऊन येणारे करत असल्याची माहिती तमाशा कलावंतांनी दिली आहे. त्यामुळे तमाशा कलावंत हैराण झाले आहेत. 

लोकांच्या या मागणीमुळे तमाशा कलावंत पुरते वैतागले असून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. प्रेक्षकांना गण गवळण, बतावणी, विनोद आणि वग हे कार्यक्रम नको आहेत. तर त्यांना आता  तोकड्या कपड्यातील डान्स हवा या अशा प्रकारच्या मागण्यांमुळेच तमाशा लोप पावत आहेत, अशी नाराजी तमाशा कलावंतांनी व्यक्त केली आहे. गौतमी पाटील  जे सादर करते ती कला नाहीये. पण तमाशाची सुपारी घेऊन येणारे प्रेक्षक गौतमी पाटीलचे व्हिडिओ दाखवात  आणि त्याच पद्धतीच्या डान्सची अपेक्षा प्रेक्षकांना आमच्याकडून करतात. याचे आम्हाला दुःख होते, असे तमाशा कलावंतांनी म्हटलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना वसंतराव नांदवळकर यांच्या तमाशा कलावंतानी यांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे. प्रेक्षकांना फक्त गौतमी पाटील सारखा डान्स हवा आहे. त्यामुळे तमाशा लोप पावत चालली आहे. हा प्रकार जर असाच चालू राहिला तर तमाशा हा तमाशा राहणार नाही तर ऑर्केस्ट्रा होईल आणि तमाशा लोप पावेल, असे या कलाकारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गौतमी पाटीला मिळणाऱ्या मानधनावारुन प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला, असा आरोप होतो. मात्र तिकडे तीन गाण्यांसाठी तीन लाख मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी होते, तर काहींचे गुडघे फुटतात, अशी टीका इंदुरीकर यांनी केली होती. त्यानंतर जेष्ठ तमाशाकलावंत रघुवीर खेडकर यांनीही याबाबत टीका केली होती.

तमाशामधल्या कुठल्या मुलीने असे हातवारे केले होते?

"बऱ्याच गावातील लोक 100 कलावंत असणाऱ्या तमाशाला दोन लाख रुपये देण्यासाठी खुटतात. अक्षरक्षः हात जोडतात. गौतमी पाटीलला पाच लाख रुपये देतात. कलेची गौतमी पाटील करु नका. लोककला लोककलाच राहिली पाहिजे. मुले कोणत्या वळणाला चालली आहेत. आई वडिलांचे लक्ष कुठे आहे? मुलगा रात्री कोणाच्या कार्यक्रमाला जातोय हे विचारत का नाही? तुमच्या मुलाला हरिपाठ पाठ नाही आणि गौतमी पाटीलची सगळी गाणी पाठ आहेत. काय चाललंय हे? तमाशाला आजपर्यंत नावं ठेवली जात होती. तमाशामधल्या कुठल्या मुलीने असे हातवारे केले होते?," असा सवाल रघुवीर खेडकर यांनी केला होता.