Free Ration Card: रेशन कार्ड धारकांना धक्का! सरकार बंद करणार…

आता केंद्र सरकार (Central Govt) ही योजना बंद करू शकते. वास्तविक, विभागाने यासाठी सूचना केल्या, त्यानंतर आता ही योजना बंद करण्याचा सरकारचा विचार आहे.

Updated: Sep 2, 2022, 12:42 PM IST
Free Ration Card: रेशन कार्ड धारकांना धक्का! सरकार बंद करणार…   title=

Ration Card : भारत सरकारने (Government of India) गरीब लोकांसाठी रेशन कार्डच्या माध्यमातून गरजू वस्तूंचे वाटप करत आहे. मात्र आता केंद्र सरकार (Central Govt) ही योजना बंद करू शकते. वास्तविक, विभागाने यासाठी सूचना केल्या, त्यानंतर आता ही योजना बंद करण्याचा सरकारचा विचार आहे.

तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये राहत असाल आणि सरकारच्या 'Free Ration Card' योजने लाभ घेत असाल तर तुम्हाला हे अपडेट माहित असणे आवश्यक आहे. 2020 मध्ये, कोविड काळात यूपीच्या योगी सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर शिधापत्रिकाधारकांसाठी मोफत रेशन योजना सुरू केली. आता तो बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

गहू-तांदळाचे पैसे मोजावे लागतील

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मिळणारे मोफत रेशन सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असेल. मात्र आता यूपीतील योगी सरकारची मोफत रेशन योजना बंद केल्यानंतर कार्डधारकांना गहू-तांदूळ आणि इतर साहित्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

सप्टेंबर महिन्यापासून हा नियम लागू होणार आहे

कार्डधारकांना गव्हासाठी प्रति किलो 2 रुपये आणि तांदूळासाठी 3 रुपये प्रति किलो मोजावे लागणार आहेत. हा बदल जुलैपासून लागू करण्यात आला आहे. यूपीमध्ये रेशनचे वितरण दोन महिने उशिराने सुरू आहे. अशा परिस्थितीत लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याच्या रेशनच्या बदल्यात पैसे द्यावे लागतील.

15 कोटी लोकांना फटका

योगी सरकारने यापूर्वी कोविड महामारीदरम्यान सुरू केलेली मोफत रेशन योजना मार्च 2022 पर्यंत वाढवली होती. मार्चमध्ये सत्तेत परतल्यानंतर आणखी तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली. सध्या यूपीमध्ये शिधापत्रिकाधारकांची संख्या 3.59 कोटी आहे. यामध्ये 3.18 कोटी घरगुती शिधापत्रिकाधारक आणि 40.92 लाख अंत्योदय कार्डधारक आहेत. दोन्ही प्रकारच्या शिधापत्रिकांवर एकूण अवलंबितांची संख्या 14.94 कोटी आहे.

आतापर्यंत पात्र कुटुंब कार्डधारकांना 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू दिला जातो. त्याचबरोबर अंत्योदय कार्डधारकांना 14 किलो गहू आणि 21 किलो तांदूळ दिला जातो. सरकार कोविडपासून आतापर्यंत हे रेशन मोफत देत होते. मात्र आता गव्हासाठी 2 रुपये किलो आणि तांदळासाठी 3 रुपये किलो मोजावे लागणार आहेत.