दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती, दोन बॅगांमध्ये आढळले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे

Delhi Woman Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाची दिल्लीत पुनरावृत्ती झाली आहे. दोन बॅगामध्ये महिलेचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 12, 2023, 05:22 PM IST
दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती, दोन बॅगांमध्ये आढळले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे title=
delhi geeta colony murder chopped body part found in yamuna khadar

Delhi Woman Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाची पुनरावृत्तीदिल्लीत घडली आहे. गीता कॉलनी परिसरात असलेल्या पूलाजवळ एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. बॅगेत मृतदेहाचे तुकडे आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी घडलेल्या या घडनेची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. मृतदेहाचे तुकडे सापडल्यानंतर पोलिसांनी लगेचच तपास हाती घेतला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. 

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाजवळ मृतदेहाचे तुकडे फेकण्यात आले होते त्यामुळं मृतदेहाची ओळख पटवणे कठिण आहे. मृत महिलेचे वय 35 ते 40 पर्यंत असेल. कोतवाली ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह दोन वेगवेगळ्या बॅगमध्ये ठेवण्यात आला होता. एका बॅगेत शिर तर दुसऱ्या बॅगेत शरीराचे इतर तुकडे ठेवण्यात आले होते. या घटनेने दिल्ली पुन्हा हादरली आहे. तर, या हत्याकांडामुळं श्रद्धा वालकर प्रकरण चर्चेत आलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दोन काळ्या पिशव्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे आढळले होते. एका पिशवीत शिर तर दुसऱ्या पिशवीत शरीराचे इतर भाग ठेवण्यात आले होते. मोठ्या केसांमुळं हा मृतदेह महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. मृतदेहाचे तुकडे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्यानंतर हत्या कशी झाली हे समोर येऊ शकणार आहे. 

पोलिसांनी पुलाच्या परिसरात लावलेले सर्व सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरुन यात काही पुराने सापडतील. रात्रीच्या अंधारात मृतदेहाचे तुकडे फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परिसरातील आजूबाजूच्या भागात बेपत्ता असलेल्या नागरिकांची यादी मागवण्यात आली आहे. जेणेकरुन मृत महिलेबाबत काही पुरावा सापडेल. 

डीसीपी सागर सिंह कलसी यांनी घटनेबाबत बोलताना सांगितले, की जमुना खादर परिसरात मृतदेहाचे दोन तुकडे केल्याचे आढळले होते. क्राइम टीम घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास करत आहेत. सुरुवातीच्या प्राथमिक तपासणीनंतर महिलेचे वय 35 ते 40 वर्षांपर्यंत असावे, असा अंदाज आहे. कोतवाली स्टेशनमध्ये 302 अंतर्गंत गुन्हा नोंद केला आहे. 

स्वाती मालीवाल यांची पोलिसांवर टीका 

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या घटनेवरुन पोलिसांवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, गीता कॉलनीमध्ये महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. पोलिसांनी नोटिस पाठवत आहोत. महिला कोण होती? आरोपी कधी पकडला जाईल? एकापेक्षा एक भयानक घटना दिल्लीत होत आहेत? कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे.