आधार कार्डमध्ये काही बदल करायचे आहेत का? आता घरबसल्या अशी होणार सगळी कामं!

आधार कार्ड युजर्स घरी बसून त्यांच्या कार्डमध्ये बदल करू शकतील आणि त्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन वेळ घालवावा लागणार नाही.

Updated: Jun 13, 2022, 07:27 PM IST
आधार कार्डमध्ये काही बदल करायचे आहेत का? आता घरबसल्या अशी होणार सगळी कामं! title=

मुंबई: भारतात आधार कार्ड महत्त्वाचा पुरावा आणि ओळखपत्र आहे. शाळा, कॉलेज, नोकरी यासह इतर ठिकाणी आपल्या ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्डची मागणी केली जाते. आधार कार्ड बनवणे प्रत्येकासाठी अनिवार्य आहे आणि उपयुक्त देखील आहे. पण कधी कधी काही तांत्रिक अडचणींमुळे तुम्हच्या आधार कार्डमध्ये चुका होतात. त्यामुळे मनस्ताप होतो आणि पुन्हा कार्यालयाचे उंबरठे झिजवण्यास मन तयार होत नाही. पण आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील तर काही काम घरूनच करू शकता.

घरबसल्या आधार कार्डमध्ये बदल करू शकता!
आम्ही तुम्हाला सांगतो की UIDAI ने घोषणा केली आहे की, येत्या काळात ते अशी सेवा सुरू करणार आहेत ज्यामुळे आधार कार्ड युजर्स घरी बसून त्यांच्या कार्डमध्ये बदल करू शकतील आणि त्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन वेळ घालवावा लागणार नाही. सर्व आधार कार्ड युजर्स आता घरबसल्याच कार्डमध्ये छोटे-मोठे बदल करू शकणार आहेत. घरोघरी आधार सेवा देण्याचे काम सुरू आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, UIDAI इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सुमारे 48 हजार पोस्टमनला प्रशिक्षण देत आहे. हे पोस्टमन प्रशिक्षणानंतर देशभरात डोअरस्टेप आधार सेवा देतील. म्हणजेच येत्या काळात पोस्टमन तुमच्या घरापर्यंत पत्रे आणि पार्सल पोहोचवतील तसेच आधार कार्डशी संबंधित सेवा देतील. हे पोस्टमन डिजिटल उपकरणे म्हणजे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप घेऊन येतील जेणेकरून ते आवश्यक अपडेट त्वरित करू शकतील.

कोणत्या सेवा समाविष्ट आहेत?
डोअरस्टेप आधार सेवेमध्ये फोन नंबर आधार कार्डशी लिंक करणे, फोटो किंवा पत्ता बदलणे इत्यादी सेवांचा समावेश असेल. या सेवेच्या पहिल्या टप्प्यात पोस्टमनना प्रशिक्षित करून देशाच्या कानाकोपऱ्यात सेवा दिली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सुमारे दीड लाख टपाल अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.