तो 'गाढव' नाही तर लखपती निघाला, खिल्ली उडवणाऱ्यांची तोंडं केली गप्प

एखाद्याला नुसतं गाढव जरी म्हटलं तरी राग येईल. 

Updated: Jun 13, 2022, 07:35 PM IST
तो 'गाढव' नाही तर लखपती निघाला, खिल्ली उडवणाऱ्यांची तोंडं केली गप्प title=

कर्नाटक : एखाद्याला नुसतं गाढव जरी म्हटलं तरी राग येईल. कारण एखाद्याला गाढव म्हणणे म्हणजे त्याला कमी लेखण्यासारख, त्याची तूलना त्या आळशी आणि बुद्धी नसलेल्या प्राण्याशी केल्यासाऱखी आहे. मात्र या घटनेत याचं गाढवांना घेऊन एका व्यक्तीने यशाचं उत्तुंग शिखर गाठलंय. त्याची ही यशोगाथा नेमकी काय आहे, ती जाणून घेऊयात...

मूळचा कर्नाटकाचा असलेल्या श्रीनिवास यांनी राज्यातील पहिले गाढवांचे पशुपालन फार्म सुरु केले होते. या त्यांच्या आयडीवरून अनेकांनी त्यांनाच कित्येकदा गाढव म्हटलेलं. मात्र या सर्वांच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्यांनी आपल्या कामावर जास्त लक्ष केंद्रीत केले आणि ते यशस्वी झाले.  

म्हणून गाढवांचे पशुपालन...
श्रीनिवास गौडा हे बंगळुरूजवळील रामनगर येथील रहिवासी आहेत. त्यांनी मंगळुरूजवळ गाढवांचे पशुपालन फार्मिंग सुरू केले होते. गाढवांची समाजाक होत असलेली दुर्दशा त्यांना बघवली नाही आणि त्यामुळेच त्यांनी असे केंद्र उघडले असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीनिवास सांगतात की, जेव्हा त्यांनी गाढवाचे फार्म उघडण्याची चर्चा केली तेव्हा अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. हे देशातील दुसरे गाढव फार्म आहे. पहिले फार्म केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात आहे. 

सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडली 

पदवीधर श्रीनिवास यांनी सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडल्यानंतर २०२० मध्ये इरा गावात २.३ एकर जमिनीवर एकात्मिक कृषी आणि पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय सेवा, प्रशिक्षण आणि चारा विकास केंद्र सुरू केले. आता त्यांच्या शेतात ससे आणि कडकनाथ कोंबड्या आहेत. तसेच फार्ममध्ये 20 गाढवे देखील आहेत. 

 कमाईचा स्त्रोत  
गाढवांच्या फार्ममधील गाढवीनींची दुध विकून तो पैसे कमावतो. एका दुधाच्या पॅकेटची किंमत 150 रुपयांपर्यंत असू शकते.गाढवांचे दूध सुपरमार्केट, मॉल्स आणि दुकानांना पुरवतात. लवकरच सौंदर्य उत्पादने बनवणाऱ्या कंपनीलाही दूध पुरवणार असून त्याला १७ लाखांची ऑर्डरही मिळाली आहे. 

पुढे श्रीनिवास सांगतात, लवकरच दुधाचे बॉटलिंग युनिट स्थापन करणार आहेत. गाढवाचे मूत्र देखील 500 ते 600 रुपये प्रतिलिटर दराने विकले जाते आणि गाढवाचे शेण खत तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते, असा त्यांचा पुढचा प्लॅन आहे.