...अन् Coldplay Concert मध्ये क्रिसनं मार्टीननं केला 'जय श्री राम'चा जयघोष! पाहा Video

Coldplay Concert Mumbai 2025 : कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये 'जय श्री राम'चा जयघोष! 

दिक्षा पाटील | Updated: Jan 19, 2025, 12:36 PM IST
...अन् Coldplay Concert मध्ये क्रिसनं मार्टीननं केला 'जय श्री राम'चा जयघोष! पाहा Video title=
(Photo Credit : Social Media)

Coldplay Concert Mumbai 2025 : नुकताच ब्रिटिश रॉक बॅन्ड 'कोल्डप्ले' चा कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टमधील या बॅन्डचा क्रिस मार्टिननं ज्या अंदाजात भारतीय चाहत्यांना संबोधित केलं त्यानं प्रेक्षकांची मने जिंकली. क्रिसचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होक आहे. त्यात तो त्याच्या चाहत्यांना संबोधित करताना दिसतोय. त्यासोबत त्यानं दाखवून दिलं की त्याच्यासाठी त्याचे चाहते किती महत्त्वाचे आहेत. पण आश्चर्य या गोष्टीचं आहे की क्रिसनं चाहत्याना 'जय श्री राम' म्हटलं आणि गर्दीत चीअर देखील केलं. त्यानंतर क्रिसनं पुन्हा एकदा 'जय श्री राम' बोलत चाहत्यांना आनंदी केलं. 

ब्रिटिश रॉक बॅन्ड 'कोल्डप्ले' भारतात आल्यानंतर चाहत्यांना खूप आनंद झाला. जगभरात लोकप्रिय असलेल्या या रॉक बॅंडचं मुंबईत स्वागत करण्यात आले. बॅंडचा लोकप्रिय गायक आणि म्युजिशियन क्रिस मार्टिनचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात तो त्याच्या चाहत्यांसोबत बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये क्रिस स्टेजच्या चारही बाजुला फिरतो आणि चाहत्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. क्रिसनं त्याच्या एका चाहत्याला पाहून सांगितलं की 'मी काल तुला मंदिरात पाहिलं असं मला वाटतंय. हो, मला आठवलं. मी तुला पाहिल्या सारखं वाटतंय. मी तुला पाहिलं होतं. मी काही अप्रतिम अशा ठिकाणी गेलो होतो.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

त्यानंतर हातात बर्थडे कार्ड घेऊन असलेल्या चाहत्याला पाहून क्रिस मार्टिननं त्या चाहत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वीकेंड असल्यानं खूप धम्माल कर असं देखील क्रिसनं सांगितलं. त्याशिवाय कोलकातावरून आलेल्या चाहत्यांचं देखील स्वागत केलं. प्रत्येक चाहत्याकडे लक्ष देत सांगत क्रिसनं सगळ्या चाहत्यांचे स्वागत केले. तुम्ही जिथून कुठून आलात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पण मग क्रिसनं त्यांच्या चाहत्यांना 'जय श्री राम' म्हणत चिअर केलं. क्रिसनं सांगितलं की 'मला याचा अर्थ माहित नाही पण जय श्री राम.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : पंकज त्रिपाठीनं पत्नीसमोर जोडले हात? VIRAL VIDEO पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर

खरंतर, क्रिस चाहत्यांनी उचललेल्या प्लाकार्डवर आणि बोर्ड्सवर लिहिलेल्या गोष्टी वाचताना दिसतो. तर तेव्हाच क्रिस हा कॉन्सर्टमध्ये आलेल्या एका चाहत्याच्या हातात असलेल्या प्लाकार्डवर जय श्री राम लिहिलेलं होतं. ते त्यानं वाचलं. जेव्हा क्रिस जय श्री राम म्हणाला त्यानंतर सगळ्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये लोकं त्याची स्तुती करत आहेत.