Belly Fat : झोपून करा फक्त 'ही' कामं; पोटाची चरबी अवघ्या काही दिवसांत होईल गायब

झोपून तुम्ही बेली फॅट कमी करण्यासाठी कोणत्या एक्सरसाईज करू शकता, हे जाणून घेऊया.

Updated: Mar 14, 2023, 05:41 PM IST
Belly Fat : झोपून करा फक्त 'ही' कामं; पोटाची चरबी अवघ्या काही दिवसांत होईल गायब title=

How To Lose Belly Fat: सध्या लोकं त्यांच्या आरोग्याकडे (Health) फार दुर्लक्ष करताना दिसताय. यामध्ये वाढलेलं पोट ही सर्वांमध्ये असलेली मोठी समस्या आहे. खासकरून पोटाचा घेर (Belly Fat) कमी करणं म्हणजेच बेली फॅट कमी करणं हे कठीण काम मानलं जातं. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आलो आहोत. बेली फॅट (Reduce Belly Fat) कमी करण्यासाठी जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही झोपण्याच्या अवस्थेत देखील बेली फॅट कमी करू शकता. 

झोपून तुम्ही बेली फॅट कमी करण्यासाठी कोणत्या एक्सरसाईज करू शकता, हे जाणून घेऊया.

लेग रेज

हा व्यायाम तुमच्या पायांची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी केली जातो. मात्र या व्यायामाचा परिणाम तुमच्या पोटाच्या चरबीवर देखील होत. पाय उचलताना पोटाच्या स्नांयूंवर ताण पडतो ज्यामुळे बेली फॅट बर्न होण्यास मदत होते. 

हा व्यायम करण्यासाठी तुम्हाला जमिनीवर सरळ झोपावं लागेल. आता दोन्ही पायांना जोडून पाय वरच्या बाजूला उचलायते आहेत. हे पाय काही वेळ अशाच स्थितीत राहू द्यावेत. पहिल्यांदा 3-5 मिनिटं अशा अवस्थेत पाय ठेवा त्यानंतर वेळेत वाढ करा.

विंडशील्ड वायपर

ही एक्सरसाईज केल्याने पायाची आणि जांघेची चरबी कमी होते. याशिवाय पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील हा व्यायाम उपयुक्त ठरू शकतो. 

हा व्यायाम करण्यासाठी झोपलेल्या अवस्थेत दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात असेल पाहिजेत. यानंतर पायांना वायपरप्रमाणे डाव्या आणि उजव्या बाजूला फिरवावेत. सुरुवातीला हा व्यायाम कमी वेळेसाठी करणं फायदेशीर ठरेल.

क्रंचेस

क्रंचेसच्या सहाय्याने तुमचं बेली फॅट अधिक वेगाने कमी होण्यास मदत होते. कंचेस मारण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सरळ झोपावं लागेल. त्यानंतर हातांना डोक्याच्या मागे ठेवावं आणि पायावर 45 डिग्रीमध्ये ठेऊन शरीर उचलण्याचा प्रयत्न करा.