Ronit Roy : अभिनेता रोनित रॉय हा त्याच्या मालिकांसाठी चांगलाच लोकप्रिय आहे. अभिनयाशिवाय त्याची स्वत: ची सिक्योरिटी एजेंसी आहे. आता रोनितनं त्याच्या करोनाच्या काळातील वाईट काळाविषयी सांगितलं आहे. त्यानं सांगितलं की या दरम्यान, तो खूप वाईट काळाचा सामना करत होता. त्याचा व्यवसाय ठप्प झाला होता. त्यानं कोव्हिडमध्ये खूप कठीण काळाचा सामना केला आहे. त्याच्याकडे काही काम नव्हतं आणि त्यात त्याचे 130 कर्मचारी होते. ज्यांच्या कुटुंबाची जबाबदारी देखील त्याच्यावर होती. रोनितनं खुलासा केला की संकटाच्या वेळी कोणत्याही सेवेशिवायही पूर्ण रक्कम भरणाऱ्यांमध्ये होते, त्यात मेगास्टार अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि करण जोहर आहेत.
रोनित रॉयनं त्याच्या सिक्योरिटी एजंसीची सुरुवात 2000 मध्ये केली होती. रोनित हा चित्रपटसृष्टीत सगळ्यात कलाकारांना सिक्योरिटी देतो. पण कोरोनाच्या काळात कंपनी वाईट परिस्थितीतून जात होते. त्यावेळी त्याच्या मदतीसाठी चित्रपटसृष्टीतील काही लोक कसे आले याविषयी त्यानं सांगितलं. रोनितनं 'लहरें रेट्रो' ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. "कोव्हिडच्या आधीचे काही महिने मी जास्त काम केलं नव्हतं. माझ्याकडे 130 कर्मचारी होते आणि त्यांचं कुटुंब देखील. आम्ही ठरवलं की सगळ्यांना पगार हा देण्यात येईल. पण माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे थोडंच आहे आणि तेव्हा मला जाणवलं की माझ्या घरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या काही कामाच्या नाहीत. काही गाड्या होत्या. ज्या मी वापरत नव्हतो. माझ्याकडे एक मिनी कूपर होती, जी मी कधी चालवलीच नव्हती, त्यामुळे मी ती विकली. त्याशिवाय अनेक लग्झरीअस वस्तू होत्या, ज्या आम्ही विकल्या आणि कर्मचाऱ्यांना पैसे दिले. मदत करत मी कोणालाही फेवर केलं नाही. ही माझी जबाबदारी होती. रोनित रॉयनं सांगितलं की अक्षय कुमार, करण जोहर आणि अमिताभ बच्चननं देखील साथ दिली होती. त्यांनी कोणताही सर्विस न घेता पैसे दिले होते. त्यामुळे तिथूनही काहीसा दिलासा मिळाला. त्यांनी 130 पैकी 30 कर्मचाऱ्यांची काळजी घेतली", असं रोनित म्हणाला.
हेही वाचा : 'मला तेव्हा काहीच वाटलं नाही...'; Animal मधील 'मॅरिटल रेप सीन'वर बॉबी देओलची पहिली प्रतिक्रिया
रोनित रॉयनं 'कसौटी जिंदगी की' मालिकेत मिस्टर बजाज ही भूमिका साकारली होती. त्यामुळे तो घरा-घरात पोहोचला होता. त्यावेळी तो नशेच्या आहारी गेला होता, याविषयी देखील त्यानं सांगितलं आहे. तो म्हणाला की तो सेटवर देखील नशेच्या अवस्थेत जायचा. त्यामुळे त्याची प्रतिमा मलीन होऊ लागली होती. त्यानं सांगितलं की त्याच्या डोक्यात यशाची हवा गेली होती. त्या सगळ्याचा कामावर देखील परिणाम होऊ लागला होता. तो झोपू शकत नव्हता. पण पत्नी आणि लेकीच्या भीतीनं त्यानं हे सोडलं. त्याला एक फोबिया देखील होता की लोक काय विचार करत असतील. त्यामुळए त्यानं मद्यपान सोडले.