5,62,51,58,48,05,00,000 एवढी संपत्ती गायब! भारताला कुणी आणि कसं लुटलं?

India Wealth : भारतात एकेकाळी  5,62,51,58,48,05,00,000 एवढी संपत्ती होती. मात्र, या संपत्तीची मोठ्या प्रमाणात लुट झाली आहे.

वनिता कांबळे | Updated: Jan 26, 2025, 11:16 PM IST
  5,62,51,58,48,05,00,000 एवढी संपत्ती गायब! भारताला कुणी आणि कसं लुटलं?  title=

India Wealth Report Oxfam International : जहां डाल डाल पर सोने की चिडfया करती है बसेरा वो भारत देश है मेरा.... असं भारताचे वर्णन केले जाते. एकेकाळी भारतातून सोन्याचा धूर निघायचं असं सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र हे खरचं आहे हे सिद्ध करणारा एक रिपोर्ट जगासमोर आला आहे. एकेकाळी भारतात 5,62,51,58,48,05,00,000 एवढी संपत्ती  होती. मात्र, ही सर्व संपत्ती गायब झाली आहे. जाणून घेऊया भारताची लुट कोणी केली.

हे देखील वाचा... 700 कार, 58 विमानं, 20 महल, 200000000 इतकी संपत्ती; पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत राजकीय नेता, गुप्त घोस्ट ट्रेन, भव्य जहाज

ऑक्सफॅम इंटरनॅशनलने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. . 'टेकर्स, नॉट मेकर्स' असे या अहवालाचे नाव आहे. स्वित्झर्लंडमध्ये  जगातील श्रीमंत आणि शक्तिशाली मान्यवरांच्या उपस्थितीत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात प्रथमच भारतात किती संपत्ती होती याचा आकडा जगासमोर आणला आहे. 

एकेकाळी भारताकडे इतकी संपत्ती होती की अमेरिका आणि चीन सारखे शक्तीशाली देशांचे काहीच अस्तित्व नसते. ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या अहवालानुसार एकेकाळी भारतात 5,62,51,58,48,05,00,000 एवढी संपत्ती  होती. मात्र, भारतातील या संपत्तीची मोठ्या प्रमाणात लुट झाली. 

1765 ते 1900 या काळात ब्रिटनने भारतात वसाहती निर्माण केल्या. या दरम्यान त्यांनी भारतातून 64.82 ट्रिलियन डॉलरची संपत्ती काढली. या रकमेचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की सध्या भारताची एकूण अर्थव्यवस्था केवळ 3.5 ट्रिलियन डॉलर आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था 28 ट्रिलियन डॉलर्सची आहे. म्हणजे ब्रिटनने अमेरिकेच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या दुपटीहून अधिक लूट केली. ब्रिटनने लुटलेल्या 65 ट्रिलियन डॉलरपैकी  33.8 ट्रिलियन डॉलर इतकी संपत्ती ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत 10 टक्के लोकांकडे गेल्याचेही या अहवालात म्हटले आहे . लंडनच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ५० ब्रिटिश पौंडांच्या नोटांनी झाकले गेले असते, तर त्या नोटांच्या तुलनेत ही रक्कम चारपट जास्त असेल असेही सांगितले जात आहे. 'ऑक्सफॅम इंटरनॅशनल' अहवालात जागतिक असमानतेबाबतही चर्चा करण्यातक आली आहे.