बॉयफ्रेंडला 'सायको' म्हणत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने शेअर केली पोस्ट; काय आहे नेमकं प्रकरण?

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या बेधडक स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.

Updated: Dec 11, 2023, 11:53 AM IST
बॉयफ्रेंडला 'सायको' म्हणत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने शेअर केली पोस्ट; काय आहे नेमकं प्रकरण? title=

मुंबई : सध्या सिनेसृष्टीत लग्नसराई सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी सध्या लग्नबंधनात अडकत आहेत, तर अनेकजण सध्या त्यांच्या प्रेमाची कबुली देत आहेत. नुकतीच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. सोनाक्षीचं नाव याआधी अभिनेता सलमान खानसोबत जोडलं जात होतं. येवढंच नव्हेतर या दोघांच्या अफेअरची इतकी चर्चा होती की, याआधी या दोघांचा एक फेक साखरपुड्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र हा फोटो फोटोशॉपद्वारे एडिट करण्यात आला असल्याचं समजलं. मात्र आता सोनाक्षीने नुकतीच आता सोशल मीडियावर तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. 

नुकताच तिच्या बॉयफ्रेंडचा वाढदिवस झाला. या निमित्ताने अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक गोंडस व्हिडिओ पोस्ट केला. याचबरोबर तिने   झहीरसाठी एक विशेष नोट देखील लिहिली. गेले अनेक दिवस  सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल खूप चर्चेत आहेत. 

सोनाक्षीने सिन्हाने बॉयफ्रेंडला म्हटलं 'सायको'  
नुकताच सोनाक्षीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. याचबरोबर तिने कॅप्शनमध्ये लिहीलं की,  'माझ्या Z(ee) आणि माझ्या पर्सनल सायको झहीर इक्बालला वाढदिवसाच्या शुभेच्छा'. हा व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने तिच्या बॉयफ्रेंडला शुभेच्छाही दिल्या आहेत. या फोटोत या लव्हबर्ड्सचे अनेक सुंदर फोटो दाखवले गेले आहेत. 

गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल या दोघांच्या अफेअर्सच्या बातम्यांनी माध्यमांमध्ये जोर धरला आहे. मात्र आजपर्यंत दोघांनीही या बातम्यांवर कधीच अधिकृतरीत्या प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, इन्स्टाग्रामवरील त्यांच्या पोस्ट्सने अनेकदा अटकळांना वाव दिला आहे. पुन्हा एकदा सोनाक्षी ही पोस्ट शेअर करुन त्यांच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अनेकदा हे लव्हबर्ड अनेक कार्यक्रमांत हजेरी लावतं. याआधी अनेकदा या लव्हबर्डला पापाराझींनी त्यांच्या कॅमेरात कैद केलं आहे. याचबरोबर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल जेव्हा अर्पिता खानच्या दिवाळी पार्टीत एकत्र आले होते तेव्हा या कपलने त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. नेहमीच हे कपल त्यांच्या नात्याबद्दल सुरु असलेल्या अटकळांमुळे चर्चेत असतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनाक्षी सिन्हाचं वर्कफ्रंट
लवकरच सोनाक्षी सिन्हा हॉरर-कॉमेडी सिनेमा काकुडा मध्ये दिसणार आहे. याशिवाय सोनाक्षी निकिता रॉय  आणि द बुक ऑफ डार्कनेसमध्ये अर्जुन रामपाल, परेश रावल आणि सुहैल नैय्यरसोबत दिसणार आहे. याशिवाय, ती बडे मियाँ छोटे मियाँमध्ये स्क्रीन शेअर करण्यास सज्ज आहे,यामध्ये ती अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत झळकणार आहे.