Thane News Today: दैव बलवत्तर तर म्हणून एका चिमुरड्याचा जीव वाचला आहे. डोंबिवलीच्या देवीचा पाडा या भागात ही घटना घडली आहे. 13 मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन एका चिमुरडा खाली पडला. मात्र एका व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळं त्याचा जीव बचावला आहे. चिमुकल्याचा किरकोळ जखमी झाला असला तरी त्याचा जीव बचावला आहे.
25 जानेवारी रोजी डोंबिवलीच्या देवाची पाडा परिसरात ही घटना घडली आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन अचानक तोल गेल्याने ती खाली पडला. मात्र तो खाली पडताना त्याचा त्यात भागातील निवासी असलेल्या भावेश म्हात्रेने पाहिलं. भावेश यांनी लगेचच त्याच दिशेने धाव घेतली आणि त्याला झेलण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हा मुलगा आधी त्याच्या हातावर आणि मग पायांवर पडला. चिमुरड्याला किरकोळ दुखातप झाली आहे. मात्र, मोठा अनर्थ टळता टळता राहिला आहे.
भावेश म्हात्रे नावाच्या तरुणामुळं या दोन वर्षांच्या चिमुरड्याचा जीव वाचला आहे. त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं तो जमिनीवर पडला नाही. या घटनेचा व्हिडिओ सीसीटिव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडिओ पाहून देव तारी त्याला कोण मारी, असंच म्हणावं लागेल. पण सगळीकडे भावेशने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे. रिअल लाइफ हिरो म्हणून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांच्या चिमुरडा बाल्कनीत खेळत बसला होता. तेव्हा खेळता खेळता तो अचानक खाली कोसळला. तोल गेल्यानंतर त्याने बाल्कनीच्या काठाला धरुन ठेवलं होता मात्र हात सुटल्यानंतर तो खाली कोसळला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.
चिमुरड्याच्या जीव वाचवणाऱ्या भावेश म्हात्रेने म्हटलं आहे की, मी बिल्डिंगच्या खालून जात असताना चिमुरड्याला कोसळताना पाहिलं. तेव्हा क्षणाचाही विचार न करताना मी त्याला वाचवण्यासाठी धावलो. जगात जाती-धर्मापेक्षाही माणुसकी आणि धैर्याची किंमत जास्त आहे.