Rich area in Nagpur : मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. तर, पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. मुंबई हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत स्थळ आहे. तर, महाराष्ट्रातील श्रीमंत शहरांच्या यादीत पुणे हे शहर दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई आणि पुणे या शहराना टक्कर देत आहे ते महाराष्ट्रातील नागपूर हे शहर. जाणून घेऊया नागपूरमधील सर्वात श्रीमंत एरिया कोणते. नागपूरमधील या भागांमध्ये मुंबई पुण्यासाठी हायफाय लाईफस्टाईल पहायला मिळते.
विदर्भातील नागपूर हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून देखील ओळखले जाते. नागपूर हे महाराष्ट्रातील झपाट्याने विकसीत होत असलेले शहर आहे. नागपूर ही महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगीक वसाहत देखील आहे. नागपूर हे शहर मेट्रो सिटी म्हणून देखील आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. दिवसेंदिवस नागपूर शहरात घरांच्या किंमती देखील वाढत आहेत.