जया बच्चन यांच्या आईची प्रकृती उत्तम; अफवांना फाटे फुटताच कुटुंबाकडून अधिकृत माहिती जारी

बुधवारी जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांच्या निधनाची बातमी खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. पण या सगळ्यावर बच्चन कुटुंबाकडून त्यांच्या तब्बेतीबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 24, 2024, 07:22 AM IST
जया बच्चन यांच्या आईची प्रकृती उत्तम; अफवांना फाटे फुटताच कुटुंबाकडून अधिकृत माहिती जारी title=

बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांची आई इंदिरा भादुरी (Indira Bhaduri) यांचे भोपाळ येथे निधन झाल्याची बातमी समोर आली होती. पण बच्चन कुटुंबियांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने हे सगळे चुकीचे असल्याचे सांगितलं आहे. बच्चन कुटुंबांनी जया बच्चन यांच्या आईची तब्बेत सुखरुप असल्याची माहिती दिली आहे. त्या सुखरुप असून त्यांची उत्तम तब्बेत असल्याचं सांगण्यात आलंय. अभिषेक बच्चनच्या टीमने देखील यावर अधिकृत माहिती देत इंदिरा भादुरी सुखरुप असल्याचं सांगितलं आहे. 

“अलीकडेच, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे, की जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांचे निधन झाले असून, त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन या दुःखद घटनेनंतर आई जया बच्चन यांना घेऊन तातडीने भोपाळला गेला आहे.  हे वृत्त खोटे असल्याची पुष्टी करण्यात आली आहे,” बच्चनच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने सांगितलं की, इंदिरा भादुरी “जिवंत आणि बऱ्या” आहेत.

 पुढे सांगितले की, "यावेळी, जया बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाचे कोणतेही नुकसान झाले नाही. चुकीच्या बातमी न पसरवण्याची विनंती केली आहे.”

सूत्राने सांगितले की, अशा चुकीच्या बातम्या आणि अहवालांमुळे कुटुंबांना त्रास होतो. “त्यांना चुकीच्या बातम्यांचा त्रास होत असल्याचं सांगितलं आहे. यावेळी प्रत्येकाने बच्चन कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि भविष्यात चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये."

चुकीच्या रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

बुधवारी अनेक अहवालांमध्ये असे म्हटले होते की, जया बच्चन यांच्या आईचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यात असा दावाही करण्यात आला आहे की, त्यांनी शेवटचा श्वास घेतला तेव्हा त्या भोपाळमध्ये होत्या आणि ती काही दिवसांपासून अस्वस्थ होती आणि वैद्यकीय देखरेखीखाली होती. .

काल रात्री इंदिराजींची तब्येत बिघडली आणि अभिषेक बच्चन यांना तातडीने भोपाळ येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. जयाही भोपाळला पोहोचल्या आहेत. दुसरीकडे, अमिताभ बच्चन यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य लवकरच रुग्णालयात पोहोचतील, ”असे अहवालात म्हटले आहे. पण हे सगळे वृत्त चुकीचे असल्याचे बच्चन कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे.