पंकजा मुंडे

पंकजा मुंडे

पंकजा मुंडेभारतीय जनता पक्ष

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांचा जन्म २६ जुलै १९७९ रोजी बीड जिल्ह्यातील परळी येथे झाला. पंकजा मुंडे यांनी बी.एस.सी. आणि एमबीए केलं आहे. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठस्सा उमटवला. पंकजा या जेष्ठ दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या भाची आहेत. पंकजा मुंडे यांचा मार्च १९९९ मध्ये विवाह झाला. पंकजा मुंडे यांना २ छोट्या बहिणी आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पंकजा यांचे चुलत भाऊ आहेत. पंकजा पालवेंचा २००९ मध्ये राजकीय प्रवास सुरु झाला. पंकजा यांनी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदापासून आपल्या राजकिय कारकिर्दीला सुरुवात केली. पंकजा मुंडे या २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या.

बीडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत वडिलांसाठी पंकजा मुंडे यांनी जवळपास ३०० गावांमध्ये सभा आणि 400 गावांना भेटी दिल्या होत्या. आघाडी सरकारने बीडचा दुष्काळी जिल्ह्यात समावेश न केल्यामुळे खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते. आज पंकजा मुंडे या भाजप सरकारमध्ये ग्रामविकास आणि महिला-बालकल्याण मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांना अनेकांनी पसंती देखील दिली होती. या दरम्यान पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप देखील झाला. पंकजा मुंडे राज्यातील बहुजन समाजाचा चेहरा आहेत.

आणखी बातम्या

dasara melava 2023  who is Yashashri Munde political entry

मुंडेसाहेबांच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री? कोण आहेत यशश्री मुंडे

मुंडेसाहेबांच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री? कोण आहेत यशश्री मुंडे

Oct 24, 2023, 15:04 PM IST
पंकजा मुंडे भगवान गडावर येण्याआधीच सभास्थळी गोंधळ, कार्यकर्त्यांचा राडा

पंकजा मुंडे भगवान गडावर येण्याआधीच सभास्थळी गोंधळ, कार्यकर्त्यांचा राडा

Pankaja Munde Bhagwan Gad: काहीजण गोंधळ घालण्यासाठी आले आहेत का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात येत आहे. 

Oct 24, 2023, 12:51 PM IST
दसरा मेळाव्यातून प्रचाराचा नारळ फुटणार; मुंबई, पुणे, बीडमध्ये राजकीय सभा

दसरा मेळाव्यातून प्रचाराचा नारळ फुटणार; मुंबई, पुणे, बीडमध्ये राजकीय सभा

Dasara Melava 2023: दसऱ्यानिमित्त आज राज्यभरात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. आज राज्याच्या विविध ठिकाणी मोठ्या राजकीय सभा होत आहेत. 

Oct 24, 2023, 07:04 AM IST
मुंडेंचा गड, राजकारणाचा फड! पंकजा मुंडे मन मोकळं करणार?

मुंडेंचा गड, राजकारणाचा फड! पंकजा मुंडे मन मोकळं करणार?

संत भगवान बाबांचं जन्मगाव असलेल्या सावरगावात होणारा हा दसरा मेळावा अनेक कारणांमुळं महत्त्वाचा असणार आहे. पंकजा मुंडे आपल्या भावी राजकीय वाटचालीचं सूतोवाच या मेळाव्यात करतील, अशी अपेक्षा आहे.

Oct 23, 2023, 22:33 PM IST
कारखाना अडचणीत, सहानुभूतीचा महापूर! नोटीस पंकजा मुंडेंना ठरणार राजकीयदृष्ट्या वरदान

कारखाना अडचणीत, सहानुभूतीचा महापूर! नोटीस पंकजा मुंडेंना ठरणार राजकीयदृष्ट्या वरदान

कधीकधी संकट संधी बनून येतं असं म्हणतात. भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या बाबतीतही हेच घडताना दिसतंय. पंकजा मुंडेंच्या ताब्यात असणाऱ्या कारखान्याला जीएसटी विभागाकडून नोटीस बजावण्यात आली. मात्र हीच नोटीस

Oct 04, 2023, 20:24 PM IST
धक्कादायक! मराठी असल्याने पंकजा मुंडेंनाही मुंबईत घर नाकारलं; Video मध्ये म्हणाल्या, 'मी कोणत्याही...'

धक्कादायक! मराठी असल्याने पंकजा मुंडेंनाही मुंबईत घर नाकारलं; Video मध्ये म्हणाल्या, 'मी कोणत्याही...'

Pankaja Munde Says Denied Home For Being Marathi: मुंबईतील मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला केवळ ती मराठी असल्याने सोसायटीने नकार दिल्याच्या मुद्द्यानंतर पंकजा मुंडेंनीही एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Sep 29, 2023, 09:56 AM IST
Pankaja Munde Interview : पंकजा मुंडे वेगळी वाट धरणार? स्पष्ट म्हणाल्या, "माझा पराभव झाला तेव्हा..."

Pankaja Munde Interview : पंकजा मुंडे वेगळी वाट धरणार? स्पष्ट म्हणाल्या, "माझा पराभव झाला तेव्हा..."

Pankaja Munde Black and White : पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस बजावली, त्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आलंय. अशातच झी 24 तासला दिलेल्या ब्लॅक अँड व्हाईट

Sep 26, 2023, 18:21 PM IST
Pankaja At Gopinath Gad Speech

VIDEO: पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर

Pankaja At Gopinath Gad Speech

Sep 10, 2023, 17:20 PM IST
'अनेक वेळा नाकारलं तरी माझा...'; पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

'अनेक वेळा नाकारलं तरी माझा...'; पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

Pankaja Munde : भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर‘शिवशक्ती’ यात्रेच्या माध्यमातून पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. कार्यकर्त्यांना साद घालत त्यांनी तोल जाऊ देऊ

Sep 10, 2023, 09:20 AM IST
'...तर परळीत माझा पराभव अशक्य होता'; पंकजा मुंडेंनी सांगितले 2019 च्या पराभवाचं कारण

'...तर परळीत माझा पराभव अशक्य होता'; पंकजा मुंडेंनी सांगितले 2019 च्या पराभवाचं कारण

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचा शिवशक्ती परिक्रमा दौरा आजपासून सुरु झाला आहे. या दौऱ्यात पंकजा मुंडे यांनी परळी येथील 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे.

Sep 04, 2023, 14:41 PM IST