पंकजा मुंडे

पंकजा मुंडे

पंकजा मुंडेभारतीय जनता पक्ष

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांचा जन्म २६ जुलै १९७९ रोजी बीड जिल्ह्यातील परळी येथे झाला. पंकजा मुंडे यांनी बी.एस.सी. आणि एमबीए केलं आहे. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठस्सा उमटवला. पंकजा या जेष्ठ दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या भाची आहेत. पंकजा मुंडे यांचा मार्च १९९९ मध्ये विवाह झाला. पंकजा मुंडे यांना २ छोट्या बहिणी आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पंकजा यांचे चुलत भाऊ आहेत. पंकजा पालवेंचा २००९ मध्ये राजकीय प्रवास सुरु झाला. पंकजा यांनी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदापासून आपल्या राजकिय कारकिर्दीला सुरुवात केली. पंकजा मुंडे या २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या.

बीडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत वडिलांसाठी पंकजा मुंडे यांनी जवळपास ३०० गावांमध्ये सभा आणि 400 गावांना भेटी दिल्या होत्या. आघाडी सरकारने बीडचा दुष्काळी जिल्ह्यात समावेश न केल्यामुळे खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते. आज पंकजा मुंडे या भाजप सरकारमध्ये ग्रामविकास आणि महिला-बालकल्याण मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांना अनेकांनी पसंती देखील दिली होती. या दरम्यान पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप देखील झाला. पंकजा मुंडे राज्यातील बहुजन समाजाचा चेहरा आहेत.

आणखी बातम्या

'जर मुलगी झाली तर...', जन्माआधीच ठरलं होतं पंकजा मुंडेंचं नाव, पण वडिलांची इच्छा अपूर्णच

'जर मुलगी झाली तर...', जन्माआधीच ठरलं होतं पंकजा मुंडेंचं नाव, पण वडिलांची इच्छा अपूर्णच

Pankaja Munde Birthday: भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी मला भेटायला येऊ नका. कारण एकाला वेळ दिला दुसऱ्याला दिला नाही तर तो

Jul 26, 2023, 11:30 AM IST
Pankaja gopinathrao Munde birthday maharashtra-politics bjp marathi news

राजकारणातला बुलंद आवाज! पाहा पंकजा मुंडे यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास

Pankaja Munde : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. वडील गोपीनाथ मुंडे यांच्याकडून वारसा मिळाल्यानंतर त्यानंतर त्या कधी थांबल्या नाहीत. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा थक्क

Jul 26, 2023, 11:08 AM IST
पंकजा मुंडे घेणार राजकीय ब्रेक; म्हणाल्या, भाजप सोडणार नाही, पक्षादेश माझ्यासाठी अंतिम!

पंकजा मुंडे घेणार राजकीय ब्रेक; म्हणाल्या, भाजप सोडणार नाही, पक्षादेश माझ्यासाठी अंतिम!

Pankaja Mundhe : राष्ट्रवादीत फूट निर्माण करून अजितदादा सत्तेत आले आहेत. त्यांच्यासोबत परळीचे आमदार धनंजय मुंडेही आले असून त्यांनाही मंत्रीपद देण्यात आले आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे या काँग्रेसच्या

Jul 07, 2023, 12:53 PM IST
औक्षण, पेढा अन् गळाभेट... धनंजय मुंडे पंकजांबरोबरचे फोटो शेअर करत म्हणाले, "बहीण-भावाचे..."

औक्षण, पेढा अन् गळाभेट... धनंजय मुंडे पंकजांबरोबरचे फोटो शेअर करत म्हणाले, "बहीण-भावाचे..."

Pankaja Munde Dhananjay Munde Celebration: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी फूट पडल्यानंतर अजित पवारांनी अवघ्या काही तासांमध्ये राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांबरोबर मंत्रीपदाची

Jul 07, 2023, 11:16 AM IST
राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप, पंकजा मुंडे काँग्रेसच्या संपर्कात? नाना पटोले म्हणतात...

राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप, पंकजा मुंडे काँग्रेसच्या संपर्कात? नाना पटोले म्हणतात...

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राज्यात पवार विरुद्ध पवार राजकारण सुरु असताना आता आणखी एक भूकंप होण्याची

Jul 06, 2023, 14:43 PM IST
मराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, पंकजा मुंडेंचा निश्चय

मराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, पंकजा मुंडेंचा निश्चय

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. विनायक मेटेंच्या स्मृतीदिन कार्यक्रमात ते बोलत होते.

Jun 30, 2023, 19:03 PM IST
AI Photos, maharashtra bjp leaders, military style, Narayan rane, ashish shelar, Chandrakant Patil, Raosaheb Danve, chandrashekhar bawankule, Devendra Fadanvis, Girish Mahajan, Radhakrishna Vikhe Patil, Pankaja munde, chitra wagh, sudhir mungantiwar, kirit somaiya, Midjourney A

AI Photos: देवेंद्र फडणवीस ते रावसाहेब दानवे; भाजप नेते मिल्ट्री स्टाईलमध्ये कसे दिसतील?

AI Photos: देवेंद्र फडणवीस ते रावसाहेब दानवे; भाजप नेते मिल्ट्री स्टाईलमध्ये कसे दिसतील?

Jun 28, 2023, 21:19 PM IST
"पंकजा मुंडेंना MIM ने दिलेली पक्षप्रवेशाची ऑफर, पण..."; असदुद्दीन ओवेसींचा गौप्यस्फोट

"पंकजा मुंडेंना MIM ने दिलेली पक्षप्रवेशाची ऑफर, पण..."; असदुद्दीन ओवेसींचा गौप्यस्फोट

Asaduddin Owaisi About Pankaja Munde: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमचे अध्यक्ष असलेल्या असदुद्दीन ओवेसींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला गौप्यस्फोट

Jun 24, 2023, 14:20 PM IST
पंकजा मुंडे स्वत:चा पक्ष काढणार? भाजप सोबत असलेल्या नाराजीविरोधात मोठा निर्णय

पंकजा मुंडे स्वत:चा पक्ष काढणार? भाजप सोबत असलेल्या नाराजीविरोधात मोठा निर्णय

पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज आहेत.  मी कधी कुणा समोर झुकणार नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी रोखठोक भूमिका मांडली. यानंतर पंकजा मुंडे स्वत:चा पक्ष काढणार का? अशी चर्चा रंगली आहे.   

Jun 03, 2023, 19:35 PM IST
सगळ्यांच्या समोर बिनधास्त भूमिका घेणार; पंकजा मुंडे भाजप बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सगळ्यांच्या समोर बिनधास्त भूमिका घेणार; पंकजा मुंडे भाजप बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मी भाजपची पण भाजप माझी थोडीच, असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या या विधानमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

Jun 03, 2023, 16:20 PM IST
Pankaja Munde: पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? गोपीनाथ गडावरून स्पष्टच म्हणाल्या...

Pankaja Munde: पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? गोपीनाथ गडावरून स्पष्टच म्हणाल्या...

Gopinath Munde's memorial day: पक्षाची आहे पण भाजप पक्ष माझा आहे का? असा सवाल उपस्थित करत सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाषण करताना कोणती भूमिका घेणार? यावर

Jun 03, 2023, 15:55 PM IST