पंकजा मुंडे

पंकजा मुंडे

पंकजा मुंडेभारतीय जनता पक्ष

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांचा जन्म २६ जुलै १९७९ रोजी बीड जिल्ह्यातील परळी येथे झाला. पंकजा मुंडे यांनी बी.एस.सी. आणि एमबीए केलं आहे. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठस्सा उमटवला. पंकजा या जेष्ठ दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या भाची आहेत. पंकजा मुंडे यांचा मार्च १९९९ मध्ये विवाह झाला. पंकजा मुंडे यांना २ छोट्या बहिणी आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पंकजा यांचे चुलत भाऊ आहेत. पंकजा पालवेंचा २००९ मध्ये राजकीय प्रवास सुरु झाला. पंकजा यांनी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदापासून आपल्या राजकिय कारकिर्दीला सुरुवात केली. पंकजा मुंडे या २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या.

बीडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत वडिलांसाठी पंकजा मुंडे यांनी जवळपास ३०० गावांमध्ये सभा आणि 400 गावांना भेटी दिल्या होत्या. आघाडी सरकारने बीडचा दुष्काळी जिल्ह्यात समावेश न केल्यामुळे खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते. आज पंकजा मुंडे या भाजप सरकारमध्ये ग्रामविकास आणि महिला-बालकल्याण मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांना अनेकांनी पसंती देखील दिली होती. या दरम्यान पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप देखील झाला. पंकजा मुंडे राज्यातील बहुजन समाजाचा चेहरा आहेत.

आणखी बातम्या

पंकजा मुंडे स्वत:चा पक्ष काढणार? भाजप सोबत असलेल्या नाराजीविरोधात मोठा निर्णय

पंकजा मुंडे स्वत:चा पक्ष काढणार? भाजप सोबत असलेल्या नाराजीविरोधात मोठा निर्णय

पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज आहेत.  मी कधी कुणा समोर झुकणार नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी रोखठोक भूमिका मांडली. यानंतर पंकजा मुंडे स्वत:चा पक्ष काढणार का? अशी चर्चा रंगली आहे.   

Jun 03, 2023, 19:35 PM IST
सगळ्यांच्या समोर बिनधास्त भूमिका घेणार; पंकजा मुंडे भाजप बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सगळ्यांच्या समोर बिनधास्त भूमिका घेणार; पंकजा मुंडे भाजप बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मी भाजपची पण भाजप माझी थोडीच, असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या या विधानमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

Jun 03, 2023, 16:20 PM IST
Pankaja Munde: पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? गोपीनाथ गडावरून स्पष्टच म्हणाल्या...

Pankaja Munde: पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? गोपीनाथ गडावरून स्पष्टच म्हणाल्या...

Gopinath Munde's memorial day: पक्षाची आहे पण भाजप पक्ष माझा आहे का? असा सवाल उपस्थित करत सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाषण करताना कोणती भूमिका घेणार? यावर

Jun 03, 2023, 15:55 PM IST
भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज?, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे घेणार भेट

भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज?, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे घेणार भेट

Eknath Khadse will meet Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज त्यांची भेट घेणार आहेत. मात्र भेटीचं कारण

Jun 03, 2023, 10:42 AM IST
Maharastra Politics: अहमदनगरचं नामांतर अन् फडणवीसांनी संधी साधली, भाजपचं हिंदुत्व की नवं 'माधव'त्व?

Maharastra Politics: अहमदनगरचं नामांतर अन् फडणवीसांनी संधी साधली, भाजपचं हिंदुत्व की नवं 'माधव'त्व?

Maharastra BJP OBC Politics: भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे मार्गदर्शक राहिलेल्या वसंतराव भागवतांकडे या कल्पनेचे जनकत्व जाते. एकीकडे आपली कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा

Jun 02, 2023, 20:39 PM IST
मुंडे भगिनी भाजपमध्ये नाराज? पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंडे भगिनी भाजपमध्ये नाराज? पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मी भाजपची पण भाजप माझी थोडीच, असं सूचक विधान पंकजा मुंडें यांनी केले आहे.  राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Jun 01, 2023, 21:04 PM IST
'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या ?

'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या ?

Pankaja Munde :  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेले सूचक विधान, सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. 'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', असे ते का म्हणाल्या, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Jun 01, 2023, 14:31 PM IST
नाशिकची द्राक्षं, नागपूरची संत्री, कोण कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?

नाशिकची द्राक्षं, नागपूरची संत्री, कोण कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?

एखाद्या राज्यातलं सर्वात शक्तिशाली राजकीय पद म्हणजे मुख्यमंत्रीपद.. मात्र सध्या महाराष्ट्रात भाव मुख्यमंत्रीपदाच्या बॅनर्सचं पिक आलंय. पाहुयात कुणाकुणाला मुख्यमंत्री व्हायचंय? .

Apr 26, 2023, 20:00 PM IST
मुंडे बहिण-भावांमध्ये दिलजमाई? आठवड्यात दुसऱ्यांदा एकाच मंचावर

मुंडे बहिण-भावांमध्ये दिलजमाई? आठवड्यात दुसऱ्यांदा एकाच मंचावर

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आठवडाभरात दुसऱ्यांदा एकाच मंचावर पाहायला मिळाले. त्यामुळे दोघांमध्ये दिलजमाई झाल्याची चर्चा आहे.

Apr 13, 2023, 17:49 PM IST