पंकजा मुंडे

पंकजा मुंडे

पंकजा मुंडेभारतीय जनता पक्ष

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांचा जन्म २६ जुलै १९७९ रोजी बीड जिल्ह्यातील परळी येथे झाला. पंकजा मुंडे यांनी बी.एस.सी. आणि एमबीए केलं आहे. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठस्सा उमटवला. पंकजा या जेष्ठ दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या भाची आहेत. पंकजा मुंडे यांचा मार्च १९९९ मध्ये विवाह झाला. पंकजा मुंडे यांना २ छोट्या बहिणी आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पंकजा यांचे चुलत भाऊ आहेत. पंकजा पालवेंचा २००९ मध्ये राजकीय प्रवास सुरु झाला. पंकजा यांनी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदापासून आपल्या राजकिय कारकिर्दीला सुरुवात केली. पंकजा मुंडे या २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या.

बीडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत वडिलांसाठी पंकजा मुंडे यांनी जवळपास ३०० गावांमध्ये सभा आणि 400 गावांना भेटी दिल्या होत्या. आघाडी सरकारने बीडचा दुष्काळी जिल्ह्यात समावेश न केल्यामुळे खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते. आज पंकजा मुंडे या भाजप सरकारमध्ये ग्रामविकास आणि महिला-बालकल्याण मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांना अनेकांनी पसंती देखील दिली होती. या दरम्यान पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप देखील झाला. पंकजा मुंडे राज्यातील बहुजन समाजाचा चेहरा आहेत.

आणखी बातम्या

दसरा मेळाव्यात गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या पिढीची एंट्री! पंकजा मुंडे म्हणाल्या- 'हा जो गोरा-गोरा...'

दसरा मेळाव्यात गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या पिढीची एंट्री! पंकजा मुंडे म्हणाल्या- 'हा जो गोरा-गोरा...'

   बीडमधील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला..या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडेंनी त्यांचा मुलगा आर्यमन याची ओळख करून दिली. आर्यमन राजकारणात सक्रीय झाल्यास मुंडे यांची तिसरी पिढी

Oct 12, 2024, 17:20 PM IST
आव्वाज कोणाचा? राजकीय नेत्यांचा दसरा मेळावा, गर्दीचा रेकॉर्ड कोण मोडणार?

आव्वाज कोणाचा? राजकीय नेत्यांचा दसरा मेळावा, गर्दीचा रेकॉर्ड कोण मोडणार?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. अशातच आता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ठाकरे गट, शिंदे गट, पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याचं आयोजन

Oct 12, 2024, 13:33 PM IST
Dasara Melava:ठाकरे, शिंदे, मुंडे की जरांगे? दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा?

Dasara Melava:ठाकरे, शिंदे, मुंडे की जरांगे? दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा?

Dasara Melava: दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा. शिवाजी पार्क आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे जणू समीकरणंच. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवाजी पार्कसाठी शिवसेनेच्या दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ झाली होती. 

Sep 29, 2024, 20:19 PM IST
पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान;  निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्ट

पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्ट

Beed Loksabha Election 2024 Result : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल झाली आहे. 

Sep 27, 2024, 21:30 PM IST
'बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्याला भर चौकात'.. पंकजा मुंडे संतापल्या

'बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्याला भर चौकात'.. पंकजा मुंडे संतापल्या

बदलापूर घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देतना तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. 

Aug 27, 2024, 18:28 PM IST
'मराठा समाजाला...', आरक्षणावरुन पंकजा मुंडेंचा थेट शरद पवारांना सवाल; म्हणाल्या 'त्यांची भूमिका..'

'मराठा समाजाला...', आरक्षणावरुन पंकजा मुंडेंचा थेट शरद पवारांना सवाल; म्हणाल्या 'त्यांची भूमिका..'

Maratha Reservation Pankaja Munde Question To Sharad Pawar: पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलनाचा फटका मतपेटीमधून बसल्याची चर्चा निकालानंतर रंगली होती.

Jul 29, 2024, 14:45 PM IST
पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळणार? वरळीपासून ते परळीपर्यंत जल्लोष

पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळणार? वरळीपासून ते परळीपर्यंत जल्लोष

Maharashtra Politics : भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाल्या आहे.. पंकजा मुंडेंनी विधान परिषद सदस्यत्वाचीही शपथ घेतली. मात्र त्यानंतर पंकजा मुंडेंनी केलेल्या विधानावरुन राजकीय

Jul 28, 2024, 22:49 PM IST
पंकजा मुंडे यांचे पती काय करतात? किती आहे संपत्ती?

पंकजा मुंडे यांचे पती काय करतात? किती आहे संपत्ती?

पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त उर्फ अमित पालवे यांच्याविषयी फार कमी जणांना माहिती आहे.

Jul 26, 2024, 13:11 PM IST