Dasara Melava 2024: राज्यात दसरा मेळाव्याची धामधुम बघायळा मिळत आहे. अनेक राजकीय पक्षांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या दसरा मेळाव्यांची सध्या जास्त चर्चा होत आहे. या दसरा मेळाव्यातून राजकीय नेते तुफान टोलेबाजी आणि टीका करताना दिसणार आहेत.
शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. या दसरा मेळाव्याची देखील जोरदार तयारी सुरु आहे. दसरा सोहळ्यासाठी शिवसैनिकांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडत असतो. त्याचप्रमाणे या वर्षी देखील हा सोहळ्या मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. या वर्षी या सोहळ्यामध्ये राजकीय टीका आणि टोलेबाजी बघायला मिळणार आहे.
राज ठाकरे यांचा दसरा मेळावा
यावर्षी राज ठाकरे डिजीटल स्वरुपात महाराष्ट्रीत लोकांशी संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दसरा मेळावा ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील मनसैनिक देखील प्रचंड उत्सुक आहेत. राज ठाकरेंचा हा दसरा मेळावा नवीन पद्धतीचा असणार आहे. यामध्ये ना कोणतीही सभा, ना कोणतेही मैदान. राज ठाकरे हे पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.
पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बीडमधील भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. 12 वर्षांनंतर या दसरा मेळाव्याला भाऊ बहिण एकत्र दिसणार आहेत. भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्याला मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बीडमधील हा दसरा मेळावा चर्चेत आहे. पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील उपस्थित राहणार आहेत.
मनोज जरांग पाटील यांचा दसरा मेळावा
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा देखील यावर्षी दसरा मेळावा पार पडणार आहे. यावर्षी मनोज जरांगे पाटील यांचा पहिलाच दसरा मेळावा असून हा दसरा मेळावा नारायण गडावर पार पडणार आहे. यासाठी नारायण गडावर मोठ्या प्रमाणात तयारी सुरु करण्यात आली असून या ठिकाणी फुलांची देखील सजावट बघायला मिळत आहे. त्याबरोबर 100 किलो बुंदीचे लाडू तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळाव्याला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. जरांगे पाटील या दसरा मेळाव्यातून कोणावर निशाणा साधतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.