धावत्या मेट्रोचा दरवाजा उघडला आणि त्याने उडी मारली, पुढे काय झालं हा धक्कादायक VIDEO

Viral Video : एका व्यक्तीने धावत्या मेट्रोचा दरवाजा उघडला आणि त्याने उडी मारली, हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 30, 2023, 10:25 AM IST
धावत्या मेट्रोचा दरवाजा उघडला आणि त्याने उडी मारली, पुढे काय झालं हा धक्कादायक VIDEO  title=
viral video man jumped from moving Metro Shocking trending on google

Viral Video : लोकल (local Video) आणि मेट्रोमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणा क्षणाला व्हायरल होत असतात. धावत्या लोकलमधून उतरताना किंवा चढताना प्रवाशांचे अनेक थरारक घटनेचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. प्लॅटफॉर्मवर असलेले सुरक्षा रक्षक देवदूत बनून त्यांचे जीव वाचवितात. पण हे प्रत्येक वेळी शक्य नसतं. धावती ट्रेन पकडणं किंवा त्यातून उतरणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण असतं. 

धक्कादायक व्हिडीओ

पण ही झाली लोकल आणि ट्रेनची गोष्ट. आता मेट्रोबद्दल बोलायचं झालं तर त्यांना स्वयंचलित दरवाजे असतात. प्लॅटफॉर्मवर मेट्रो थांबवल्यावर ते उघडतात आणि ट्रेन सुटताना बंद होतात. असं असतानाही सोशल मीडियावर एका धक्कादायक व्हिडीओने यूजर्सला धक्का बसला आहे. या व्हिडीओमधील व्यक्तीने धावत्या मेट्रोचे दरवाजे उडले आणि त्याने खाली उडी मारली.(viral video man jumped from moving Metro Shocking trending on google)

व्हिडीओ व्हायरल 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरील  Out of Context Human Race नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमधील व्यक्ती मेट्रोचे दरवाजे बळजबरीने घडतो आणि उडी घेतो. मेट्रो तोपर्यंत प्लॅटफॉर्मवर पोहोचली असल्याने तो प्लॅटफॉर्म जाऊन जमिनीवर तोंडावर पडतो. 

उडी मारण्याचं कारण

हा व्हिडीओ न्यूयॉर्क मेट्रोचा आहे. त्या व्यक्तीने दारुच्या नशेत हे धक्कादायक कृत्य केलं आहे. या घटनेत व्यक्तीला खूप दुखापत झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यापासून 20 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. तर 7 हजारांहून अधिक युजर्सनी तो लाइक केला आहे. 

कमेंटमध्येही एका यूजर्सने धक्कादायक वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला की, ''न्यूयॉर्क मेट्रोमध्ये ही गोष्ट खूप सामान्य आहे. '' दारूमुळे अनेकांचे संसार आणि जीवन उद्धवस्त झाले आहे. आपलं कोणी तरी घरी वाट पाहत आहे, ही भावना काय या लोकांच्या मनात येतं नाही. मेट्रोमधून अशाप्रकारे उडी मारणे हा गुन्हा आहे. 

सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेन आणि दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. मुंबई लोकलमधील महिला डब्ब्यातील बसण्याच्या जागेवरुन हाणामारीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. तर दिल्ली मेट्रो तर गेल्या काही महिन्यांपासून अश्लील गोष्टीमुळे प्रसिद्ध झाली आहे.