धक्कादायक! पोलिओ व्हॅक्सिनसाठी पाकीस्तानमध्ये गोळीबार, पोलिसाचा मृत्यू

पाकिस्तानात (Pakistan) एक धक्कादायक घटना घडली आहे. पाकिस्तानात पोलिओ लस (polio vaccine) पथकावर अंदाधुंद गोळीबार (attacks on polio vaccination teams ) करण्यात आला आहे. 

Updated: Jan 14, 2021, 09:44 PM IST
धक्कादायक! पोलिओ व्हॅक्सिनसाठी पाकीस्तानमध्ये गोळीबार, पोलिसाचा मृत्यू title=

लाहोर : पाकिस्तानात (Pakistan) एक धक्कादायक घटना घडली आहे. पाकिस्तानात पोलिओ लस (polio vaccine) पथकावर अंदाधुंद गोळीबार (attacks on polio vaccination teams ) करण्यात आला आहे. करक शहराजवळ पोलिओ लस पथकावर हा हल्ला घडवून आणण्यात आला आहे. मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात टोळक्याच्या हल्ल्यात जुनैदुल्लाह नावाच्या पोलिसाचा मृत्यू झाला आहे. गेल्या 8 वर्षांत गोळीबारात 102 सुरक्षा जवान ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलिओ लस घेऊन गेलेल्या पथकावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यावेळी पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. हा हल्ला सकाळी करण्यात आला. एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने यांची माहिती एका वाहिनीला दिली.

कॉन्स्टेबल जुनैदुल्लाह लातूंबर भागात पोलिओ सुरक्षा कर्तव्यावर होता. हल्लेखोर मोटारसायकलवर आले आणि त्यांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि पोलिओ लसीकरण दल व्हॅनमध्ये होते. त्यामुळे ते थोड्क्यात बचावले. या हल्ल्यात दुसर्‍या कोणालाही दुखापत झाली नाही आणि परिसरात पोलिओ लसीकरण मोहीम अजूनही सुरू आहे.

गतवर्षी, करक आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये खैबर पख्तूनख्वा प्रांतातील 15 पैकी 15 पोलिओचे रुग्ण आढळले आहे. त्यामुळे येथे पोलिओ लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मात्र, काहींचा याला विरोध आहे. दरम्यान, 11 जानेवारी 2021 पासून कराची येथे डोर-टू-डोर पोलिओ लसीकरण मोहीम सुरु आहे. एक आरोग्य कर्मचारी मुलाला पोलिओ लसचे डोस देत आहेत. 

दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघाचे सांगितले की, पाकिस्तान आणि शेजारील अफगाणिस्तान सोडून जगातील प्रत्येक देशात पोलिओचे निर्मूलन करण्यात आले आहे.