दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी चीफ अब्दुल रहमान मक्कीचा (Abdul Rahman Makki) पाकिस्तानच्या लाहोरमध्ये (Lahore) मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हार्ट अटॅकमुळे त्याचं निधन झालं आहे. अब्दुल रहमान मक्की हा मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा (Hafiz Saeed) नातेवाईक आहे. मक्कीला अमेरिकेने जागित दहशतवादी जाहीर केलं आहे. भारतात तो वॉण्टेड आहे. अब्दुल रहमान मक्की लष्कर-ए-तोयबाच्या टेरर फंडिंगचं काम पाहत होता.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मक्कीला 1267 ISIL (दा'एश) आणि अल कायदा प्रतिबंधित समितीअंतर्गत जागतिक दहशतवादी जाहीर केलं होतं. यासह त्याची संपत्तीही जप्त करण्यात आली होती. त्याच्यावर प्रवासासाठी बंदी घालण्यात आली होती आणि शस्त्रांसह बंदी होती.
अब्दुल रहमान मक्कीlr 16 जानेवारी रोजी ISIL आणि अल कायदाशी संबंधित लष्कर-ए-तैयबाच्या पाठिंब्याने दहशतवादी वित्तपुरवठा, कट रचणे, कट रचण्यात सहभाग, भरती इत्यादींमध्ये सामील असल्याची नोंद करण्यात आली होती. मक्की हा लष्करची राजकीय शाखा जमाद उद दावाचा प्रमुखही होता. ते लष्करच्या परराष्ट्र संबंध विभागाचे प्रमुखही राहिले आहेत.