Tata Motors ने ग्राहकांचा गाडी चालवण्याचा अनुभव अधिक चांगला होण्यासाठी SUV मॉडेलला अपडेट केले आहे. टाटाने या बदलासाठी Amazon सोबत हात मिळवणी केली आहे. या पार्टनरशिपचा फायदा सरळ लोकांना होणार आहे. कारण Nexon, Harrier, Nexon EV आणि Safari सारख्या मॉडेल्स अपडेट करण्यात आले आहेत. या नव्या अपडेटसोबत टाटा मोटर्सने या एसयूवी मॉडेल्स चालवण्यासाठी Alexa वॉइस कमांड सपोर्टचा फायदा या कारमध्ये मिळणार आहे. या गाड्यांमध्ये इन बिल्ट एलेक्सा सपोर्ट देण्यात आला आहे.
टाटाच्या गाड्यांमध्ये मिळणाऱ्या या वॉइस कमांड सपोर्ट हिंदी, इंग्लिश आणि Hinglish अशा भाषांचा समावेश आहे. या नव्या फिचरमुळे आतापेक्षा अधिक चांगला ड्रायव्हिंग अनुभव घेता येणार आहे.
Alexa सपोर्ट मिळाल्यानंतर, आता तुम्ही फक्त बोलून वाहनातील तापमान बदलू शकता, एअरफ्लो सेटिंग देखील बदलू शकता, स्क्रीनचा ब्राइटनेस देखील यामधून बदलता येणार आहे. , सनरूफ उघडणे आणि बंद करणे आणि इतर अनेक गोष्टी. या वैशिष्ट्याची ओळख झाल्यानंतर , तुम्ही आता फक्त बोलूनच कारमध्ये हे करू शकाल. एवढेच नाही तर तुम्ही व्हॉईस कमांडद्वारे 360 डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा देखील सहज नियंत्रित करू शकता.
टाटा नेक्सॉन, टाटाची सर्वाधिक विक्री होणारी सब-कॉम्पॅक्ट SUV ची सुरुवातीची किंमत 8 लाख 10 हजार रुपये आहे, तर Nexon EV ची किंमत 14 लाख 74 हजार रुपयांपासून सुरू होते. तर, 2023 Tata Harrier आणि 2023 Tata Safari च्या किंमती 15 लाख 49 हजार रुपये आणि 16 लाख 19 हजार रुपयांपासून सुरू होतात. सर्व मॉडेल्सच्या किंमती एक्स-शोरूम किंमती आहेत. टाटा मोटर्सने इतर गाड्यांमध्ये हे फिचर असेल की नाही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
याीसोबत ग्राहकांनाी गाीडत 360 डिग्री कॅमेरा देखील नियंत्रित केले जाऊ शकते. Alexa म्युझिक प्ले देखील करणार आहे. तसेच ऑडिओबुक देखील ऐकू शकता. याला जोक विचारू शकता तसेच गेम देखील खेळू शकते. नेविगेट करू शकता आणि ट्रॅफिकपासून स्वतःचा बचाव करू शकता.