Makar Sankranti 2025 : नवीन वर्षातील पहिला आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा सणापैकी एक असा मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2025 ला साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात महिला यादिवाशी सुगड पूजा करतात. त्यासोबत 'तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला' असं म्हणत तिळगुळाचं वाटप करतात. तर पुरुष मंडळींसह मुलं यादिवशी उंच आकाशात रंगीबेरंगी पंतग उडवतात.
मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. पण काळा रंगासोबत इतर रंगाचे कपडे किंवा महिला साड्या नेसतात. तर यंदा मकर संक्रांतीला कोणता रंगांचे कपडे परिधान करायचे नाहीत ते पाहूयात.
14 जानेवारी 2025 ला सूर्य सकाळी 8.55 वाजता मकर राशीत संक्रमण करणार आहे. यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार आहे. तर देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तर देवीने पिवळं वस्त्र परिधान करत हातात गदा आणि केशरी टिळा लावलाय. देवीचं हे रुप यंदा कुमारी आहे. त्यामुळे यंदाचा मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंगाचे कपडे वर्ज्य आहे. पण महिला मकर संक्रांतीला काळा रंगाच्या साडीशिवाय हिरवी, लाल, गुलाबी, केशरी रंगांची साडी नेसणे शुभ आहे.
यंदा मकर संक्रांतीला पिवळा रंगाचे कपडे, पिवळ्या रंगाच्या वस्तू, त्यासोबत देवी केशरी टिळा लावून आल्यामुळे केशरी रंगाचा टिळा, जाईचा फुलांचा गजरा, पिवळ्या रंगाच्या बांगड्या, पिवळ्या रंगाची फुले वर्ज्य आहेत.
तर मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालणे शुभ मानले जाते. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे. त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या घाला.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)