इवल्याशा कारच्या धडकेत चेपली टोयोटा इनोव्हा! नेमकी कोणती आहे ही गाडी?

एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत MG Comet EV आणि Toyota Innova Hycross यांच्यात धडक झालेली दिसत आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर टोयोटाचं प्रचंड नुकसान झालेलं असता, तुलनेत एमजी कॉमेट मात्र चांगल्या स्थितीत दिसत आहे.  

शिवराज यादव | Updated: Oct 18, 2023, 07:09 PM IST
इवल्याशा कारच्या धडकेत चेपली टोयोटा इनोव्हा! नेमकी कोणती आहे ही गाडी? title=

सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये दोन गाड्यांची रस्यावर धडक दिल्याचं दिसत आहे. अपघाताच्या या व्हिडीओत इतकं काय विशेष आहे असा विचार जर तुम्ही करत असाल तर तो व्हिडीओ पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. याचं कारण MG Comet EV आणि Toyota Innova Hycross यांच्यात ही धडक झाली आहे. आणि विशेष म्हणजे या धडकेनंतर टोयोटाच्या कारच्या मागील भागाचा अक्षरश: चुरा झाला आहे. हायवेवर हा अपघात झाला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओमधून अपघात नेमका कसा झाला याची काही माहिती मिळत नाही आहे. तसंच घटनेची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. पण व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, अपघातानंतर टोयोटा एमपीव्हीचं जबरदस्त नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे तुलनेने हलकी असणारी एमजी कॉमेट मात्र काही नुकसान वगळता सुस्थितीत दिसत आहे. 

आता धडक झाली तेव्हा टोयोटा जागेवर थांबलेली होती की धावत होती हे समजलेलं नाही. हायवेवरुन जाणाऱ्या एका प्रवाशाने आपल्या गाडीतून हा व्हिडीओ शूट केला आहे. व्हिडीओत अपघानंतर जमा झालेले लोकही आश्चर्याने पाहत उभे असल्याचं दिसत आहे. 

एमजी कॉमेटची बॉडी अत्यंत मजबूत तयार करण्यात आली आहे. दरम्यान अपघातानंतर टोयोटाच्या मागच्या बाजूचं नुकसान झालं असलं तरी इतर भाग मात्र सुरक्षित आहेत. या अपघातात चालक, प्रवाशांना काही जखम झाली नसल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. 

एमजी कॉमेटमध्ये सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, रेअर पार्किंग कॅमेरा, सेन्सर्स असे फिचर्स आहेत. 

केंद्र सरकार वारंवार रस्ते सुरक्षेसाठी आवाहन करत आहे. यासंबंधी कायद्यातही अनेक बदल करण्यात आले आहेत. एप्रिल 2021 नंतर निर्मिती करण्यात आलेल्या कारमध्ये सर्व सीट्सना एअरबँग देणं बंधनकारक आहे.