7 हजार पगाराची मोलकरीण; अचानक कमवायला लागली करोडो, सुनेला कळलं सासऱ्यांचं गुपित

Crime News : एक विचित्र घटना समोर आलीय. ज्योतिषीचार्याकडे कामा करणारी 7 हजार पगाराची मोलकरीण अचानक करोडोपती झाली. मुलगा आणि सुनेला संशय आला अन् तिने मोलकरीणचा मोबाईल तपासल्यास सासऱ्यांचं ते गुपित उघड झालं. 

नेहा चौधरी | Updated: Jan 7, 2025, 08:45 PM IST
7 हजार पगाराची मोलकरीण; अचानक कमवायला लागली करोडो, सुनेला कळलं सासऱ्यांचं गुपित  title=

Crime News : एक धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये एक प्रसिद्ध ज्योतिषचार्य त्याचा मुलगा आणि सुनेसोबत राहत होता. त्यांच्याकडे एक मोलकरीण 7 हजार पगाराची नोकरी करत होती. अचानक एक दिवस ती करोडोंचा वस्तू वापरायला लागली. मुलगा आणि सुनेला तिच्या या वर्तनावर संशय आला. दुसरीकडे वडील वडिलोपार्जित जमीन विकत होती. मुलाने विचारल्यास नवीन जमीन घेत आहोत, असं ते सांगायचे. पण त्यांचा बोलण्याच लपवा छपवी जाणवत होती. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात. 

काय आहे नेमकं प्रकरण?

अलखधाम नगर इथे खूप प्रसिद्ध ज्योतिषाचार्य राहतात. त्यांच्याकडे तीन वर्षांपासून पिंकी गुप्ता नावाची महिला घरकाम करायची. तिला या कामासाठी ज्योतिषचार्य महिन्याला 7 हजार रुपये द्यायचे. पण अचानक मुलगा आणि सुनेच्या लक्षात आलं की मोलकरीणकडे अचानक खूप पैसे आले आहेत. दुसरीकडे घरातील महागड्या वस्तू पण गायब व्हायला लागल्या होत्या. आता मुलगा आणि सुनाला संशय यायला लागला. मोलकरीण घरातील वस्तू चोरून पैसे कमावतंय. त्यांनी तिच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली. त्यांचा एक गोष्ट लक्षात आली ती फक्त ज्योतिषाचार्याची खोली आणि ड्रॉइंग रूम स्वच्छ करायची. मग ज्योतिषाचार्याच्या सुनेने पिंकीचा फोन तपासायचा प्लॅन केला. संधी मिळताच सुनेने पिंकीचा फोन तपासला अन् तिला धक्काच बसला. ते जे काही विचार करत होते, गोष्ट त्यापेक्षा काही वेगळी होती. (7 thousand salary maid Suddenly started earning crores daughter in law found out father in law secret Honey Trap viral news)

सून आणि मुलाने ज्योतिषाचार्याकडे या गोष्टीची विचारणा केल्यावर त्यांना रडू कोसळलं. त्यांनी घडलेला प्रकार सून आणि मुलाला सांगायला सुरुवात केली ते म्हणाले, की 'पिंकीने तिचा प्रियकर राहुल मालवीय याच्या मदतीने माझे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केलं. त्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ती माझ्याकडून पैसे उकळायला सुरुवात केली. शहरात असलेली प्रतिष्ठा मलीन होऊ नये म्हणून मी गोष्ट कोणालाही सांगितली नाही. तिने आतापर्यंत माझ्याकडून चार कोटी रुपये घेतले आहेत. तिने सोन्याची साखळीदेखील घेतली आहे.’

पिंकी गुप्ता बऱ्याच दिवसांपासून ज्योतिषाचार्याला ब्लॅकमेल करत होती. या पिंकीने ज्योतिषाचार्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं आणि त्या माध्यमातून चार कोटी रुपये उकळले होते. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या साथीदारांना अटक केली आहे. 

या प्रकरणी नीलगंगा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तीन महिलांना अटक केलीय. यात पिंकीची बहीण आणि आईदेखील समावेश असून पिंकीचा प्रियकर फरार आहे. पोलिसांनी तिच्या घरातून सुमारे 45 लाख रुपयांची रोकड आणि 55 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केलंय.