Sholay Unseen Scene : अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचा सदाबहार आणि ब्लॉकबस्टर चित्रपट 'शोले' रिलीज होऊन 50 वर्षांनंतरही खूप पसंत मिळतंय. चित्रपटगृहांमध्ये तो पुन्हा प्रदर्शित झाल्यामुळे मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. चित्रपटात असे अनेक प्रसिद्ध सीन आहेत ज्यांना स्टँडिंग ओव्हेशन मिळाली आहे. पण तुम्हाला माहितीये या चित्रपटातील अनेक सीन हे सेन्सॉरच्या फटकारल्यानंतर कापण्यात आले होते. शोलेच्या 'गब्बर सिंग'ची भयंकर स्टाइल पाहून सेन्सॉर बोर्डाला जोरदार धक्का बसला होता. आज तोच सीन तब्बल 49 वर्षानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
1975 मध्ये प्रदर्शित झालेला 'शोले' हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सदाबहार चित्रपटांपैकी एक मानला जातो. त्याच्या दमदार कथेने मनं जिंकली आणि प्रेक्षकांना त्याचं चाहतं बनवलं. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने त्यात अनेक कट दिलंय. याआधी हटवलेला गब्बर सिंगचा एक सीन आता व्हायरल होत असून त्यावर लोकांची प्रतिक्रिया येत आहेत.
'ओल्ड इज गोल्ड' नावाच्या एका इंस्टाग्राम अकाऊंटने अलीकडेच अशाच एका हटवलेल्या दृश्याचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये गब्बर सिंग भयंकरपणे उभा आहे आणि सचिन पिळगावकरच्या अहमद (अमजद खानने साकारलेला) पात्राचे केस ओढताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला डाकूंचा ताफा असतो. जास्त हिंसाचार आणि गब्बरच्या हिंसक अवतारामुळे सेन्सॉर बोर्डाने हा सीन हटवला होता. गब्बर सिंगने अशी भीती निर्माण केली की त्याच्या पात्राची क्रूरता दाखवणारी अनेक दृश्ये सेन्सॉर झाली.
'शोले'चा प्रत्येक डायलॉग हिट आणि ब्लॉकबस्टर आहे, विशेषत: हा डायलॉग, 'यहां से पचास मील दूर, जब बच्चा रात को रोता है, तो मां कहती है, ‘तू जा बेटा, नहीं तो गब्बर आ जाएगा'.