16 हजारहून कमी दरात मिळतोय Google Pixel चा दमदार फोन, Amazon वर धाडकन कोसळल्या किंमती!

Google Pixel 8a: आता तुमच्याकडे फक्त 16 हजार रुपयांमध्ये गुगल पिक्सेल 8 सिरिजचा एक पॉवरफूल फोन खरेदी करण्याची संधी आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jan 25, 2025, 10:17 AM IST
16 हजारहून कमी दरात मिळतोय Google Pixel चा दमदार फोन, Amazon वर धाडकन कोसळल्या किंमती! title=
गुगल पिक्सल स्मार्टफोन

Google Pixel 8a: तुम्हीदेखील दमदार फिचर्सवाला बजेट फोन शोधत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. कमी किमतीत पॉवरफूल कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याची ही एक उत्तम चालून आली आहे. गुगलचे स्मार्टफोनबद्दल यूजर्सच्या मनात क्रेझ असते. हे फोन प्रीमियम श्रेणीत येतात. सामान्य अँड्रॉइड स्मार्टफोनच्या तुलनेत या फोनचे फीचर्स थोडे वेगळे आहेत. त्यांच्या किमतींमध्येही खूप फरक आहे. 

गुगल पिक्सेल स्मार्टफोन खूप महाग असल्याने अनेकजण घ्यायला मागत नाही. पण आता तुमच्याकडे फक्त 16 हजार रुपयांमध्ये गुगल पिक्सेल 8 सिरिजचा एक पॉवरफूल फोन खरेदी करण्याची संधी आहे.

ई-कॉमर्स वेबसाइट्स सध्या प्रीमियम कॅटगरीतील स्मार्टफोनवर उत्तम डील्स देत आहेत. दरम्यान अमेझॉनने गुगल पिक्सेल स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात केली आहे. यावेळी अमेझॉनवर गुगल पिक्सल 8 मालिकेतील पिक्सल 8a स्मार्टफोनच्या किंमती धाडकन कोसळल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना या संधीचा फायदा घेता येणार आहे. जर तुम्ही सेल्फी काढत असाल किंवा फोटोग्राफी करत असाल तर तुमच्याकडे कमी किमतीत पिक्सल 8a स्मार्टफोन खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.

गुगल पिक्सेल 8ए च्या किमतीत मोठी कपात

गुगल पिक्सल 8a सध्या Amazon वर 49 हजार 999 रुपयांच्या किमतीत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. असे असले तरी सध्या Amazon ग्राहकांना यावर 22% सूट मिळणार आहे. डिस्काउंट ऑफरसह तुम्ही हा फ्लॅगशिप स्मार्टफोन फक्त 38 हजार 999 रुपयांना खरेदी करू शकता. याशिवाय जर तुम्ही ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला 5% कॅशबॅक ऑफर देखील मिळेल. गुगल पिक्सल 8एच्या 128 जीबी व्हेरिएंटवर ही ऑफर उपलब्ध आहे.

तुम्ही हा स्मार्टफोन 16 हजार रुपयांना खरेदी करून घरी घेऊन जाऊ शकता. हे ऐकून तुम्हाला खूप भारी वाटलं असेल पण ही ऑफर मिळविण्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. यावर Amazon ग्राहकांना 22 हजार 800 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देत आहे. तुमचा जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही 22 हजार 800 रुपयांपर्यंत बचत करू शकता. जर तुम्हाला या ऑफरची पूर्ण किंमत मिळाली तर तुम्हाला गुगल पिक्सलचा हा फोन 16 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. 

गुगल पिक्सेल 8ए चे फिचर्स 

गुगल पिक्सेल 8ए हा स्मार्टफोन गुगलने गेल्या वर्षी मे महिन्यात लाँच केला होता. यामध्ये तुम्हाला अॅल्युमिनियम फ्रेमसह प्लास्टिकचा बॅक पॅनेल मिळतो.यामध्ये तुम्हाला 6.1 इंचाचा OLED पॅनेल असलेला डिस्प्ले मिळतो. याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे.डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कंपनीने त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 दिले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 वर चालतो. कंपनीने या प्रीमियम फोनमध्ये गुगल टेन्सर जी3 दिले आहे. यामध्ये तुम्हाला 8 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 64 + 13 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 13 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.