Royal Enfield Shut Down Sale of This Bike : क्लासिक बाईक म्हटलं की रॉयल एनफील्ड कंपनी सगळ्यांना आठवते. तर अशा क्लासिक बाईक बनवण्यासाठी लोकप्रिय असलेल्या रॉयल एनफील्ड कंपनीनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानं महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यानं रॉयल एनफील्डच्या चाहत्यांना नक्कीच वाईट वाटणार आहे. त्याचं कारण म्हणजे आता भारतात स्क्रॅम 411 ची विक्री बंदी होणार आहे. कंपनीनं त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर बाईक आता मार्केटमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. या आधी कंपनीनं स्क्रॅम 440 ला लॉन्च केलं होतं. ही बाईक नुकतीच ऑटो एक्सपोमध्ये देखील दाखवण्यात आली होती. या बाईकची किंमत ही 2.08 लाख रुपये एक्स शोरुम किंमत आहे.
या बाईकमध्ये 411 सीसीचं इंजन आहे. तर 6,500rpm वर 24.3bhp आणि 4250rpm वर 32Nm चं टार्क जनरेट करते. हे इंजन 5-स्पीड गेअरबॉक्ससोबत जोडण्यात आलं आहे. पण हायवेवर स्पीडनं प्रवास करताना सहाव्या कॉगची कमी जाणवत होती. नव्या रॉयल एनफील्ड स्क्रॅम 440 ही मोठ्या इंजनसाठी, जास्त पॉवर आणि 6-स्पीड गियरबॉक्ससोबत 411 ला टक्कर देण्यास सक्षम होती. त्यात ट्यूब-टाईप टायरसोबत वायर-स्पोक रिम आणि ट्यूबलेस टायरसोबत एलॉय व्हीलचे देखील ऑप्शन मिळतात.
हेही वाचा : Mahakumbh 2025 : ममता कुलकर्णी होणार किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर, संगममध्ये करणार पिंडदान
स्क्रॅम 440 च्या स्कॅम 440 ची किंमत स्क्रॅमनं 411 पेक्षा 2000 नं जास्त होती. त्यामुळे कंपनीनं स्क्रॅम 411 ला बंद करत आता फक्त 440 ला मार्केटमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयल एनफील्डच्या या निर्णयानं क्लासिक बाईक खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांना देखील मोठा झटका बसला आहे. खरंतर, कंपनी ही स्क्रॅम 440 ला लॉन्च करुन लोकांना 411 च्या जागी एक ऑप्शन दिला आहे.