zee24taas

वायरल झाली 'मारहाण', महिला रेल्वे कर्मचारी सस्पेंड

सेंट्रल रेल्वेनं एका महिला कर्मचाऱ्याला प्रवाशांसोबत केलेल्या मारहाणीमुळे सस्पेंड केलंय. महिला कर्मचाऱ्याचा या वागणुकीचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर रेल्वे मंत्रायलानं सरळ हस्तक्षेप करत कर्मचाऱ्याविरोधात कारवाई केली. एवढंच नव्हे तर ट्विट करून मंत्रालयाची याची माहितीही दिली. 

Nov 17, 2015, 12:10 PM IST

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची जागा निश्चित, पंतप्रधानांनीही वाहिली आदरांजली

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागा निश्चित झालीय. त्याची घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एक संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. 

Nov 17, 2015, 11:34 AM IST

सेहवागनं गाणं गात मारला सिक्सर, तुम्ही पाहिला?

जेव्हा विरेंद्र सेहवाग निवृत्त झाला. तेव्हा टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं एक मजेदार किस्सा ऐकवला होता. गांगुलीनं सांगितलं, सेहवाग बॅटिंग करतांना गाणं म्हणतो. गांगुलीचा हा दावा खरा ठरलाय. कारण नुकताच क्रिकेट ऑल स्टारमधील मॅच दरम्यान बॅटिंग करतांना सेहवागचा गाणं गायचा एक व्हिडिओ वायरल झालाय.

Nov 17, 2015, 11:07 AM IST

इसिसला संपवणारच, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होलांद यांचा निर्धार

फ्रान्स इसिसला संपवण्यासाठी कटीबद्ध आहे असं सांगत या कामात अमेरिका आणि रशियानं एकत्र येऊन मोहीमेत सहभागी व्हावं, असं आवाहन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स फ्रँकस होलांद यांनी केलंय. 

Nov 17, 2015, 10:54 AM IST

आदित्य ठाकरेंना झटका, युवासेनेचे दोन्ही जिम जमीनदोस्त होणार

मरीन लाईन्सवर आदित्य ठाकरेंच्या पुढाकारनं उभारण्यात आलेल्या ओपन एअर जिमची संकल्पना उच्चस्तरीय समितीनं फेटाळून लावलीय. त्यामुळं सध्या अस्तित्वात असणारी दोन जिमही जमीनदोस्त करावी लागणार आहेत. 

Nov 17, 2015, 10:42 AM IST

सलमानला आता 'कमाल'चा आधार!

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या अभिनेता सलमान खाननं या घटनेचा साक्षीदार असलेला गायक कमाल खानला साक्षीदार बनवण्याची मागणी केली आहे. सलमानची ही मागणी हायकोर्टानं मान्य केल्यास या प्रकरणाला नवं वळण मिळ्याची शक्यता आहे. 

Nov 17, 2015, 09:49 AM IST

ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर मिशेल जॉन्सनचा आंतराराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिशेल जॉन्सननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. मंगळवारी न्यूझिलंड विरुद्ध पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचनंतर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं.

Nov 17, 2015, 09:35 AM IST

सागर शेजवळ हत्या प्रकरणाचा उलगडा, नऊ आरोपी जेरबंद

शिर्डीतल्या सागर शेजवळ हत्या प्रकरणाचा उलगडा झालाय. मोबाईल फोनच्या रिंगटोनच्या वादातून ही हत्या झाल्याचं उघड झालंय. पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी याची कबुली दिलीय. शिर्डीतील गुंड प्रवृत्तीच्या विशाल कोते आणि त्याच्या साथीदारांनी अमानुष मारहाण करत अपहरण करून शिंगवे गावातील निर्जन परिसरात त्याची दगडानं ठेचून निर्घुणपणे हत्या केली. 

Nov 15, 2015, 10:34 PM IST

अमळनेरला संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

जळगावमध्ये एका शिक्षकानं विष प्राशन करुन आत्महत्या केलीय. अमळनेर तालुक्यात ही घटना घडलीय. नवल भाऊ कृषि विद्यालयातील विजय गरबड पाटील यांनी विष प्राशन करुन जीवनप्रवास संपवलाय.

Nov 15, 2015, 10:09 PM IST