zee24taas

'हार पे चर्चा'करण्यासाठी आज भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक

बिहारमधल्या दारूण पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी आज भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक बोलावण्यात आलीय. पक्षाचे अध्यक्ष अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली दुपारनंतर ही बैठक होणार आहे. यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते पत्रकार परिषदही घेण्याची शक्यताय.

Nov 9, 2015, 09:19 AM IST

'ज्यांचे पाय जमिनीवर नव्हते ते आपटले', सामनातून भाजपवर टीका

बिहारमध्ये भाजपच्या पराभवाचा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून चांगलाच समाचार घेतलाय. लोकभावना उद्याचा जनदेश आहे. आमचे पाय जमिनीवर आहे, ज्यांचे नव्हते ते आपटले.. अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखात भाजपवर सडकून टीका करण्यात आलीय. 

Nov 9, 2015, 09:05 AM IST

कोकण रेल्वेला प्रभूंचं दिवाळी गिफ्ट!

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणी जनतेला दिवाळीची महत्वपूर्ण भेट दिली. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ सुरेश प्रभू आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत कोलाड इथं झाला. 

Nov 8, 2015, 09:14 PM IST

तिच्यावर प्रेमाचा दावा करणाऱ्या नराधमानं केलं दुहेरी हत्याकांड

नवी मुंबईतील दिघ्यात एक धक्कादायक प्रकरण पुढे आलंय. चार आणि आठ महिन्यांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश झालाय. मुलीच्या प्रेम प्रकरणातून दिपक वाल्मिकी या आरोपीनं तिच्या भावाची हत्या केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर वाल्मिकीनं पारसिक डोंगररांगांमध्ये हत्या करून त्याचं डोकं वेगळं केलं ते जमिनीत गाडलं आणि धड शेजारील तलावात टाकलं.

Nov 8, 2015, 08:50 PM IST

ढाई किलो हात पुन्हा रूपेरी पडद्यावर, 'घायल वन्स अगेन'चं पोस्टर रिलीज

सनी देओल पुन्हा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्याच्या 'घायल वन्स अगेन'चं पोस्टर रिलीज झालंय. चित्रपटातील प्रमुख भूमिकेसोबत सनी देओलनं त्याचं दिग्दर्शनही केलंय. या चित्रपटात ओम पुरी आणि सोहा अली खान पण प्रमुख भूमिकेत आहेत.

Nov 8, 2015, 07:50 PM IST

ना वाढणार लठ्ठपणा, ना कोलेस्ट्रॉल... जाणून घ्या कसं!

हिवाळा येताच सर्व प्रकारच्या भाज्या भूकेसोबतच आपला मोहही वाढवतो. त्यामुळं हिवाळ्यात अधिक जेवण जातं. हिवाळ्यात पचनक्रिया चांगली असते. मात्र कॅलरी आणि कोलेस्ट्रॉल वाढतोत. हेल्दी जेवणासोबत अनहेल्दी सवयींपासून कसं दूर राहता येईल, हे जाणून घेणं आवश्यक आहे. जाणून घ्या काही हेल्दी सवयी ज्यामुळं आजारांपासून आपण हिवाळ्यात दूर राहाल आणि तुमचा लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल वाढणार नाही.

Nov 8, 2015, 05:53 PM IST

विकेट खराब नव्हती पण ही बॉलर्सची मॅच होती - कोहली

भारतानं जरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली टेस्ट मॅच तीन दिवसांच्या आत जिंकली. तरी कॅप्टन कोहलीनं म्हटलं की, विकेटमध्ये काही कमतरता नव्हती. पण त्यानं कबुल केलं ही मॅच बॉलर्सची होती.

Nov 8, 2015, 05:01 PM IST