मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागा निश्चित झालीय. त्याची घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एक संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी मुख्यमंत्री बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये असणाऱ्या स्मृतीस्थळी येणार आङेत.
त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषदेत जागेची घोषणा करतील असं आता पुढे येतंय. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनं मुंबईतील काही जागा निश्चित करून मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सोपवला आहे. त्यात शिवाजी पार्क इथल्या महापौर निवासाच्या जागेचाही समावेश आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही या जागेवर शिवसेनाप्रमुखांचं स्मारक उभारण्यासाठी अनुकूल असल्याचं समजतं.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे हे जनतेच्या भल्यासाठी झटणारे नेते होते असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरव्दारे बाळासाहेब ठाकरे यांना आंदरांजली वाहिली. बाळासाहेबांना कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच आदराचं स्थान होतं असंही मोदींनी म्हटलंय.
Balasaheb Thackeray was committed to the well-being of people. He was widely admired by Karyakartas. Tributes to him on his Punya Tithi.
— Narendra Modi (@narendramodi) November 17, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.