zee24taas

अखेर युवराजनं कबुल केलं, म्हणाला तिच्यात आईचं प्रतिबिंब

टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंहनं अखेर आपला साखरपुडा झाल्याचं कबुल केलंय. अभिनेत्री हेजल किचसोबत त्यानं इंडोनेशियातील बाली इथं साखरपुडा केलाय.

Nov 15, 2015, 09:33 PM IST

...जेव्हा बिग बींनी लोकलनं प्रवास केला

बिग बी अमिताभ बच्चन यांनी लोकल ट्रेनमधून प्रवास करत मुंबईकरांना सुखद धक्का दिलाय... रविवारी सकाळी अचानक बिग बींनी सीएसटीवरुन भांडुपला जाणारी ट्रेन पकडली. यावेळी बिग बी आणि ट्रेनमधल्या प्रवाशांमध्ये गप्पाही रंगल्या.. 

Nov 15, 2015, 08:30 PM IST

आजपासून रेल्वे, विमान प्रवास, हॉटेलमधील जेवण, मोबाईल फोन महाग

देशात स्वच्छतेला वाव देण्यासाठी चौदा टक्के सेवाकरासोबत अतिरिक्त ०.५ टक्का स्वच्छ भारत अधिभार लागू करण्यात आलाय. आजपासून हा कर लागू झाल्यानं आज रविवारपासून उच्च श्रेणीचा रेल्वे प्रवास महागणार आहे. केवळ रेल्वेच नाही तर तब्बल १२० सेवा यामुळे महाग होणार आहेत.

Nov 15, 2015, 07:12 PM IST

दिवाळीनंतर निघणार दिवाळं, पेट्रोल-डिझेल महागलं

दिवाळी संपताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून पेट्रोलच्या दरात प्रति लीटरमागे ३६ पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लीटरमागे ८७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज मध्यरात्री १२ वाजेपासून ही नवीन दरवाढ लागू होणार आहे. 

Nov 15, 2015, 06:36 PM IST

दहशतवादाविरोधात जगानं एकत्र येण्याची गरज - पंतप्रधान

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांची परिषदही झाली. भारतासह ब्राझिल, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या संघटनेचे सदस्य आहेत. पॅरीस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधात जगानं एकत्र यायची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलून दाखवली.

Nov 15, 2015, 05:45 PM IST

पॅरिसनंतर तुर्कीतही दहशतवादी हल्ला, चार पोलीस जखमी

तुर्कस्तानातल्या अंतल्यामध्ये जी-२० परिषद ISISच्या टार्गेटवर असल्याचं स्पष्ट झालंय. आज ही परिषद सुरू होत असतानाच दक्षिण तुर्कस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला झालाय. 

Nov 15, 2015, 05:24 PM IST

रणबीर आणि दीपिकाचा 'छोटा तमाशा' पाहिला?

यंदा १४ नोव्हेंबरला बालदिनानिमित्त अनेकांनी आपले लहान मुलांचे फोटो किंवा अनेकांनी मुलांचे लहानपणीचे फोटो सोशल नेटवर्किंग साइट्सवर टाकले. तर रणबीर कपूर-दीपिका पादुकोणच्या 'तमाशा' चित्रपटाच्या टीमनंही एक फोटो शेअर केला.

Nov 15, 2015, 05:04 PM IST

फटाके उडवतांना घ्या ही काळजी!

दिवाळी जसा दिव्यांचा सण आहे तसाच दिवाळीत फटाक्यांची मजाही काही औरच असते. पण हे फटाके उडवतांना जरा काळजी घ्यावी... ध्वनी प्रदूषण आणि वायूप्रदूषण करणारे फटाके टाळावेच... फटाके उडवत असाल तर विशेष काळजी घ्यावी म्हणजे दिवाळीचा मनमुराद आनंद घेता येईल.

Nov 9, 2015, 04:30 PM IST

अबब! आयफओनवर तब्बल ३४ हजारांपर्यंतची सूट

दिवाळीनिमित्त स्मार्टफोन यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. अॅपलनं आपल्या लेटेस्ट आयफोनवर तब्बल ३४ हजारांपर्यंतची सूट दिलीय.

Nov 9, 2015, 04:12 PM IST