ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर मिशेल जॉन्सनचा आंतराराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिशेल जॉन्सननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. मंगळवारी न्यूझिलंड विरुद्ध पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचनंतर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं.

Updated: Nov 17, 2015, 09:35 AM IST
ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर मिशेल जॉन्सनचा आंतराराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा  title=

पर्थ: ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिशेल जॉन्सननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. मंगळवारी न्यूझिलंड विरुद्ध पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचनंतर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं.

जॉन्सन म्हणाला, 'मला वाटतं की क्रिकेटला अलविदा करण्याची हीच योग्य वेळ आहे. मी भाग्यवान आहे की, मला देशासाठी खेळायची संधी मिळाली आणि माझा प्रवास चांगला राहिला.' तो म्हणाला, वाका (पर्थ ग्राउंड) त्याच्यासाठी खूप खास आहे. म्हणून निवृत्तीसाठी त्यानं हेच स्टेडियम निवडलं.

३४ वर्षीय फास्ट बॉलर म्हणाला,'मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. मला वाटत नाही की, मी आता टीम सोबत राहण्यासाठी तितकी मेहनत करू शकतो.'

मिशेल जॉन्सनचे रेकॉर्ड्स

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००५मध्ये न्यूझिलंड विरुद्ध डेब्यू करणारा मिशेल जॉन्सन ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी बॉलर्स पैकी एक आहे. विकेट घेण्याच्या बाबतीत तो शेन वॉर्न (७०८), ग्लेन मॅकग्राथ (५६३) आणि डेनिस लिली (३५५)नंतर चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानं आपल्या करिअरमध्ये एकूण ७३ टेस्ट मॅच खेळल्या. जॉन्सननं ३११ विकेट्स घेतल्या. तर १५३ वनडे मॅचमध्ये त्यानं २३९ विकेट्स घेतल्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.