पॅरिस: फ्रान्स इसिसला संपवण्यासाठी कटीबद्ध आहे असं सांगत या कामात अमेरिका आणि रशियानं एकत्र येऊन मोहीमेत सहभागी व्हावं, असं आवाहन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स फ्रँकस होलांद यांनी केलंय.
आणखी वाचा - बेल्जियमचा अब्दुल हामिद पॅरीस बॉम्बस्फोटाचा मूख्य सूत्रधार
पॅरिसमधील इसिसच्या दहशतवाद्यांनी घडवलेल्या नरसंहारानं फ्रान्स हादरला असून इसिसविरोधात फ्रान्सनं मोहीमच उघडली आहे. सीरियातील राक्का इथल्या इसिसच्या अड्ड्यांवर फ्रान्सनं हवाई हल्ले केले आहेत.
आणखी वाचा - दहशतवादाविरोधात जगानं एकत्र येण्याची गरज - पंतप्रधान
सोमवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकस होलांद यांनी इसिसविरोधात युद्धच पुकारलं. होलांद म्हणाले सीरिया प्रश्नावर जागतिक स्तरावर एकमत होणं गरजेचं असून दहशतवाद्यांनी कारवाई झाली पाहिजे. सीरिया ही दहशतवादाची फॅक्टरी बनली असून फ्रान्स इसिसला संपवण्यासाठी कटीबद्ध आहे, असं ते म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.