नवी दिल्ली/मुंबई: सेंट्रल रेल्वेनं एका महिला कर्मचाऱ्याला प्रवाशांसोबत केलेल्या मारहाणीमुळे सस्पेंड केलंय. महिला कर्मचाऱ्याचा या वागणुकीचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर रेल्वे मंत्रायलानं सरळ हस्तक्षेप करत कर्मचाऱ्याविरोधात कारवाई केली. एवढंच नव्हे तर ट्विट करून मंत्रालयाची याची माहितीही दिली.
सोशल मीडियावर वायरल झालेल्या या व्हिडिओनुसार, १२ नोव्हेंबरला मुंबईतील लोकमान्य टर्मिनसवर प्रवासी तिकीटच्या रांगेत उभे होते. तेव्हा महिला कर्मचारी तिकीट देण्याऐवजी पैसे मोजायला लागली. एका प्रवाशानं यावर आक्षेप घेतला, कारण त्याला उशीर होत होता. त्यावर ही महिला कर्मचारी संतापली आणि तिनं त्याला मारहाणही केली.
एका दुसऱ्या प्रवाशानं या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि नंतर सोशल मीडियावर टाकला. रेल्वे मंत्रालयानं लगेच कारवाईचे आदेश दिले आहेत. रेल्वेच्या या कारवाईची सोशल मीडियावर स्तुती होतेय.
लोकमान्य तिलक टर्मिनल्स पर आज दिनांक 12 /11/2015 को दोपहर लगभग 2:30बजे एक महिला टिकिट वितरक ,टिकिट देने के समय अपने कैश का हिसाब कर रही थी , तब यात्री ने अपत्ति की , कि पहले आप टिकिट बांटे बादमे जब आपकी डयूटी बदलने का समय होंगा तब कॅश का हिसाब मिलावे।इस बात पर काफी हंगामा हुआ जिसकी रिकॉर्डिंग मै पोस्ट कर रहां हूं।कृपया अपनी राय देवे।
Posted by Navdeep Bihani on Thursday, November 12, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.