uttar pradesh

एड्सने झाली अनाथ मुले, स्मशानात राहण्याची वेळ!

उत्तरप्रदेशातील प्रतापगडमध्ये चार निरागसमुलं गेल्या तीन महिन्यांपासून स्मशानात राहात आहेत..त्या मुलांच्या पालकांचा एड्समुळे मृत्यू झालाय..त्यामुळे गावकर-यांनी या मुलांना गावाबाहेर काढलंय..त्यामुळेच त्यामुलांवर स्मशानभूमीत राहण्याची वेळ आलीय..

Jul 26, 2013, 10:50 PM IST

`जातीनिहाय रॅली काढाल तर याद राखा`

उत्तरप्रदेशात जातीनिहाय रॅलीज नकोत असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. जातीनिहाय रॅलीज सुरू आहेत त्या तातडीने थांबवण्यात याव्यात असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलाय.

Jul 11, 2013, 03:59 PM IST

टीव्हीवरील आत्महत्येची नक्कल करताना मुलाचा मृत्यू

टीव्हीवर आत्महत्येचे दृश्य पाहून नक्कल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहा वर्षाच्या मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहे. कुटुंबियांना दिलेल्या माहितीनुसार तेजस याने एक दिवसापूर्वी आत्महत्येचे दृश्य टीव्हीवर पाहिले होते.

May 24, 2013, 03:40 PM IST

समाजवादी पक्षाच्या नेत्याने ट्रेनमध्ये काढली तरूणीची छेड

धावत्या ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढणा-या उत्तर प्रदेशच्या समाजवादी पक्षाच्या नेत्याला अटक करण्यात आलीये. चंद्रनाथ सिंह असं या नेत्याचं नाव आहे.

Mar 18, 2013, 09:15 AM IST

बहिणीची मान उडवून भावाने गाठले पोलीस ठाणे

उत्तर प्रदेशमधील बइराइच जिल्ह्यातील राणीपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ताजपूर गावात शनिवारी धक्कादायक घटना घडली. भावानेच आपल्या सख्या बहिणीची धारधार हत्याराने मान छाटली आणि छाटलेली मान घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले.

Mar 10, 2013, 01:47 PM IST

घरात घुसून झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ती घरात शांत झोपली होती. मात्र, घरात कोणी नसल्याचे पाहून एका तरुणाने घरात घुसखोरी केली आणि १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशमधील आजमगढ जिल्ह्यात.

Mar 5, 2013, 01:21 PM IST

दिल्ली गारठली, युपीत थंडीचे ९२ बळी

थंडीमुळं राजधानी दिल्ली चांगलीच गारठली. गोठवणाऱ्या थंडीचे उत्तर प्रेदशमध्ये आतापर्यंत ९२ बळी गेले आहेत. थंडी कायम असल्याने तपमानात घट होण्याची शक्यता आहे.

Dec 31, 2012, 12:13 PM IST

कॅच सोडला, पण जीव गमवावा लागला

कॅचेस् विन मॅचेस असे म्हणतात. पण, एक सोडलेला झेल आपला प्राण घेऊ शकतो हे उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील एका १५ वर्षीय तरुणाला माहिती नव्हते.

Dec 10, 2012, 05:16 PM IST

उत्तर भारतीयाला महाराष्ट्रात आरक्षण कसे?

उत्तर भारतीयाला महाराष्ट्रात आरक्षण कसे दिले जाऊ शकते, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. त्यांना महाराष्ट्रात आरक्षणाची सुविधा कशी मिळू शकते, अशी विचारणा करीत न्यायालयाने स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

Oct 6, 2012, 10:48 AM IST

युपीत रेल्वे अपघातात सात ठार, ५० जखमी

हावड्याहून डेहराडूनला जाणा-या डून एक्‍सप्रेसला उत्तर प्रदेशात जौनपूर येथे अपघात झाला. या अपघातात सात प्रवासी ठार झालेत तर ५० जण जखमी झालेत. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. डून एक्‍सप्रेसला दुपारी सव्‍वा एकच्‍या सुमारास अपघात झाला.

May 31, 2012, 03:01 PM IST

देशातली पहिली नाईट सफारी उत्तरप्रदेशात

जंगलातून फिरायचंय तेही रात्री... ही संधी आता भारतातही उपलब्ध होणार आहे. कुठे माहित आहे... उत्तरप्रदेशात.

May 30, 2012, 02:24 PM IST

यूपीतील रेल्वे अपघातात १५ ठार

उत्तर प्रदेशात हाथरस येथील रेल्वे दुर्घटनेत १५ प्रवासी ठार झाले आहेत. आज सकाळी हाथरस येथे रेल्वेची धडक कारला बसल्याने हा अपघात झाला. हा अपघात आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एका रेल्वे क्रॉसिंगजवळ झाला.

Mar 20, 2012, 10:41 AM IST

अखिलेश यादव यूपीचे मुख्यमंत्री

अखिलेश यादव आज उत्तर प्रदेशच्य़ा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. युपीचा आजवरचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. सपाच्या विधीमंडळ गटाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी अखिलेश यांचं नाव निश्चित करण्यात आले होते.

Mar 15, 2012, 03:36 PM IST

गोव्यात काँग्रेसच्या राज्यात भाजप

मागील निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवत आपल्याकडे सत्ता खेचून आणली. हाच कित्ता आता भाजपने गिरवल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री दिंगबर कामत यांना पुन्हा सत्तेत बसण्यापासून भाजपने रोखण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सन्नाटा पसरला आहे.

Mar 6, 2012, 11:10 AM IST

गोव्यात ४० तर युपीत ६० जागांसाठी मतदान

गोवा आणि उत्तर प्रदेशातील शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदानाला आज शनिवारी सकाळी सातवाजल्यापासून सुरुवात झाली. गोव्यात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन तासात २० टक्के मतदान झाले आहे. गोव्यात ४० तर उत्तर प्रदेशात ६० जागांसाठी मतदान होत आहे.

Mar 3, 2012, 10:40 AM IST