`जातीनिहाय रॅली काढाल तर याद राखा`

उत्तरप्रदेशात जातीनिहाय रॅलीज नकोत असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. जातीनिहाय रॅलीज सुरू आहेत त्या तातडीने थांबवण्यात याव्यात असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 11, 2013, 04:01 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, लखनऊ
उत्तरप्रदेशात जातीनिहाय रॅलीज नकोत असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. जातीनिहाय रॅलीज सुरू आहेत त्या तातडीने थांबवण्यात याव्यात असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलाय.
केंद्र, राज्यसरकार तसंच चार महत्त्वाच्या राजकीय पक्षांना याबाबत नोटीसही पाठवण्यात आलीय. बसपाने नुकतंच ४० जिल्ह्यात ब्राह्मण भाईचारा संमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यातल्या एकाला मायावती उपस्थित होत्या. त्यावरून मोतीलाल यादव यांनी जनहीत याचिका दाखल केली होती.

समाजवादी पक्षानही अशाच संमेलनाचं आयोजन केलं होतं. समाजाच्या एकात्मतेला अशी संमेलनं घातक असल्याचं याचिकेत म्हटलं होतं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.