www.24taas.com, झी मीडिया, प्रतापगड, उत्तरप्रदेश
उत्तरप्रदेशातील प्रतापगडमध्ये चार निरागसमुलं गेल्या तीन महिन्यांपासून स्मशानात राहात आहेत..त्या मुलांच्या पालकांचा एड्समुळे मृत्यू झालाय..त्यामुळे गावकर-यांनी या मुलांना गावाबाहेर काढलंय..त्यामुळेच त्यामुलांवर स्मशानभूमीत राहण्याची वेळ आलीय..
ही चिमुरडी मुलं गेल्या अनेक दिवसांपासून स्मशानभूमीत राहात आहेत...इथं राहण्यावाचून त्यांच्या समोर दुसरा पर्याय उरला नाही.. त्यांची ओळख लपवण्यात आली कारण एड्समुळे त्यांच्या पालकांचा मृत्यू झालाय..ही निरागस मुलं ज्या अवस्थेत राहात आहे ते बघितल्यानंतर तुमच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही..या मुलांची ही दैना पाहून कदाचीत स्मशानही दु:ख झालं असेल मात्र या परिसरात राहणा-या लोकांच्या हृदयाला पाझर फुटला नाही.. या मुलांची कहाणी हृदयविदारक आहे..एडसमुळे आईवडिलांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी या कोवळ्यामुलांसाठी घराचे दरावाजे कायमचे बंद केले....त्यामुळेच स्मशानात राहण्याची वेळ त्याच्यावेळ त्यांच्यावर आलीय..
उत्तरप्रदेशातील प्रतापगडच्या स्मशानात ही चिमुरडी राहात असून धक्कादायक बाब म्हणजे संपूर्ण गावाला याविषयी माहिती आहे..गावातील काही लोक दयाभावनेतून मुलांना कधी कधी खाण्यापिण्यासाठी देतात..पण या मुलांच्या डोक्यावर छत नाही..त्यांना पुन्हा सामान्य मुलांसारखं जगता यावा यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही..
स्पर्श केल्यामुळे एडस होत नाही अशी सरकारकडून जाहिरात केली जाते त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात..पण ही परिस्थिती बघीतल्यानंतर या योजनेचं वास्तव तुमच्या लक्षात येईल...
सराकारी बाबूंना कधी जाग येणार हा तर खरा प्रश्नच आहे आता ही परिस्थिती समोर आल्यानंतर सरकारचे डोळे उघडणार का ?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.