www.24taas.com,नवी दिल्ली
थंडीमुळं राजधानी दिल्ली चांगलीच गारठली. गोठवणाऱ्या थंडीचे उत्तर प्रेदशमध्ये आतापर्यंत ९२ बळी गेले आहेत. थंडी कायम असल्याने तपमानात घट होण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात थंडी वाढत असताना दिल्लीत सगळ्यात कमी तापमान नोंदवलं गेलं. दिल्लीत रविवारी रात्री ५.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीय. हे तापमान या सीझनमधलं सगळ्यात कमी तापमान असल्याचं सांगण्यात येतंय.
थंडीमुळं दिल्लीकर आणि उत्तर भारतातील नागरिकांचे हाल होतायत. दुसरीकडे उत्तर प्रदेशात थंडीमुळं ९२ जणांचा मृत्यू झालाय.
गोंडा, देवरिया, बलिया, बांदा आणि हमीरपुर या जिल्ह्यात प्रत्येक एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील २४ तासात थंडी वाढण्याची शक्यता आहे.
लखनऊचे तपमान ०.७ अंश सेल्सियस इतके खाली गेले आहे. काही भागात सहा ते ११ अंश सेल्सियस असे तपमान आहे.