uttar pradesh

मुस्लिम युवकाने हनुमान चालिसा केला उर्दुत भाषांतरीत

 श्रीमद भगवत गीतेनंतर आता हनुमान चालिसा उर्दूमध्ये वाचता येणार आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका मुस्लिम युवक आबिद याने हनुमान चालिसा उर्दूत भाषांतरीत केले आहे. 

Aug 10, 2015, 07:16 PM IST

उत्तर प्रदेशात मुंबईतील महिलेवर सामूहिक बलात्कार

सात जणांनी बहराइच जिल्ह्यातील नवाबगंज पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या परिसरात मुंबईतील एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलीय.

Jul 28, 2015, 04:55 PM IST

पत्नीची हत्या करून घरात लपवला मृतदेह, पतीला अटक

उत्तर प्रदेशच्या मेरठ इथं एका दारूड्या नवऱ्यानं आपल्या पत्नीची हत्या केली आणि तीन दिवस घरातच तिचा मृतदेह ठेवला. जेव्हा पसरलेल्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय आला, तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपी पतीला अटक केलीय.

Jul 6, 2015, 12:02 AM IST

निर्भया कांडप्रमाणे उत्तर प्रदेशात गॅंगरेप, मुलीचे मूत्रपिंड निकामी

दिल्लीतील निर्भया कांडप्रमाणे उत्तर प्रदेशमधील बदायुमध्ये गॅंगरेपची घटना समोर आली आहे. नराधम आरोपींनी एका १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या नराधमानी तिच्या अंगावर हल्ला करत तिच्या मूत्रपिंडाचे नुकसान केले. यात मूत्रपिंड निकामी झाले.

Jul 1, 2015, 04:54 PM IST

व्हॉट्सअॅपवर झाली मैत्री, ती निघाली आईच्या वयाची, पाहून तरूण पळाला

व्हॉट्सअॅपवर महिलेशी मैत्री झाल्यावर तीने भेटायला बोलविल्यावर तरूण त्या ठिकाणी पोहचला पण त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ती महिला त्याच्या आईच्या वयाची निघाली. 

Jun 15, 2015, 06:28 PM IST

धक्कादायक: ‘ग्लुकॉन डी’मध्ये सापडल्या अळ्या

नेस्लेच्या मॅगीमध्ये हानीकारक पदार्थ अतिप्रमाणात आढळल्यानंतर आता ‘ग्लुकॉन डी’ या प्रसिद्ध एनर्जी ड्रिंकच्या पॅकेटमध्ये अळ्या सापडल्यानं खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंद शहर जिल्ह्यात ‘ग्लुकॉन डी’च्या पावडरमध्ये अळ्या सापडल्या आहेत. 

Jun 9, 2015, 06:01 PM IST

राम मंदिर बांधा अन्यथा लोकांचा विस्फोट : कटीयार

अयोध्येत राम मंदिर बांधण्याची गरज आहे. अन्यथा लोकांचा विस्फोट होईल. त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्याकडे कोणतेही सरकार दुर्लक्ष करु शकत नाही, असे विधान भाजपचे उत्तर प्रदेशचे नेतृत्व करणारे राज्यसभेतील खासदार विनय कटीयार यांनी केले.

Jun 3, 2015, 01:35 PM IST

देशभरात उष्णतेची लाट कायम, आतापर्यंत १४१२ जणांचा मृत्यू

देशभरात उष्णतेची लाट आहे. आत्तापर्यंत चौदाशे बारा लोकांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. पुढील दोन दिवस तापमान चढेच राहिल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

May 28, 2015, 10:25 AM IST

देशभरात उष्णतेनं लाही लाही, आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू

देशात उष्णतेचा कहर वाढतच चाललाय. आतापर्यंत देशभरात जवळपास ११०० जणांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशात सर्वाधिक ८५२ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे तेलंगणात २६६ नागरीकांचा मृत्यू झाला. 

May 27, 2015, 11:09 AM IST

भूकंपामुळे भारतात ५१ जणांचा मृत्यू, बिहारमधील ३८ जण दगावले

भयंकर भूकंपानं शनिवारी देशातील विविध भागांमध्ये कमीतकमी ५१ जणांचा मृत्यू झालाय. तर जवळपास २३७ जण जखमी झाले आहेत. या धक्क्यांमुळे अनेक इमारतींचं नुकसान झालंय. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता.

Apr 26, 2015, 09:26 AM IST