गोव्यात ४० तर युपीत ६० जागांसाठी मतदान

गोवा आणि उत्तर प्रदेशातील शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदानाला आज शनिवारी सकाळी सातवाजल्यापासून सुरुवात झाली. गोव्यात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन तासात २० टक्के मतदान झाले आहे. गोव्यात ४० तर उत्तर प्रदेशात ६० जागांसाठी मतदान होत आहे.

Updated: Mar 3, 2012, 10:40 AM IST

www.24taas.com, पणजी, लखनऊ

गोवा आणि उत्तर प्रदेशातील शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदानाला आज शनिवारी सकाळी सातवाजल्यापासून सुरुवात झाली. गोव्यात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन तासात २० टक्के मतदान झाले आहे.  गोव्यात ४० तर उत्तर प्रदेशात  ६० जागांसाठी मतदान होत आहे.

गोवा विधानसभेच्या ४० मतदारसंघांतून २१५ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य १०,२६,३०६ मतदारांच्या हातात आहे. तर उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यात दहा जिल्ह्यातील ६० मतदारसंघात मतदान होत आहे. या मतदारसंघातून ९६२ उमेदवार रिंगणात असून, १ कोटी ८२ लाख मतदार आपला हक्का बजाविणार आहेत.

गोव्यामध्ये एकूण २१५ उमेदवारांमध्ये  ९ महिला विधानसभा निवडणुकीत  नशीब आजमावत आहेत.  कॉंग्रेसने दोन, राष्ट्रवादी कॉंग्रेसने एका महिलेला उमेदवारी दिली आहे. भाजपने पक्षातील एकाही महिलेला उमेदवारी दिलेली नाही, परंतु अपक्ष उमेदवार माजी प्रदेश कॉंग्रेसाध्यक्ष निर्मला सावंत यांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे ४०, तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व भाजप युतीचे ३६उमेदवार आहेत, तर चार अपक्षांना भाजपने पाठिंबा दिलेला आहे.

दरम्यान,  उत्तरप्रदेशातील बिज्नोर, मोरादाबाद, भीम नगर, ज्योतिबा फुले नगर, बडाऊन, बरेली, पिलिभीत, शाहजहानपूर आणि लखीमपूर खेरी या दहा जिल्ह्यात मतदान होत आहे.  निवडणुकीच्या रिंगणात अनेक दिग्गज नेत आहेत.