युतीबाबत पुन्हा बोलणी, सेना नेते भाजप नेत्यांची घेणार भेट

शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती जागा वाटपावरुन ताणली गेली होती. शिवसेना १५१ जागांवर तर भाजप १३० जागांवर ठाम असल्याने युतीबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. मात्र, जागांच्या अदलाबदल होण्याच्या दृष्टीने विचार होऊ शकतो. त्यासाठी शिवसेना नेते भाजप नेत्यांची भेट घेणार आहे. त्यामुळे रुळावरून घसरलेली बोलणी पुन्हा ट्रकवर येत असल्याचे दिसत आहे.

Updated: Sep 23, 2014, 11:30 AM IST
युतीबाबत पुन्हा बोलणी, सेना नेते भाजप नेत्यांची घेणार भेट title=

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती जागा वाटपावरुन ताणली गेली होती. शिवसेना १५१ जागांवर तर भाजप १३० जागांवर ठाम असल्याने युतीबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. मात्र, जागांच्या अदलाबदल होण्याच्या दृष्टीने विचार होऊ शकतो. त्यासाठी शिवसेना नेते भाजप नेत्यांची भेट घेणार आहे. त्यामुळे रुळावरून घसरलेली बोलणी पुन्हा ट्रकवर येत असल्याचे दिसत आहे.
 
शिवसेना-भाजप युतीतील बोलणी पुन्हा सुरु होणार आहे. त्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत, सुभाष देसाई हे भाजप नेते ओमप्रकाश माथूर आणि राजीव प्रताप रुडी  यांची भेट घेणार आहे. त्यामुळे हे युती टिकविण्याबाबत शेवटचे प्रयत्न असतील. वसंत स्मृतीवर भाजपची दुपारी बैठक होत आहे. त्यावेळी शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष कार्यकारीत जाहीरपणे सांगितले, १५१-११९-१८ असेच जागांचे वाटप होईल. याखाली जाणे शक्य नाही. मात्र, भाजपनेही आक्रमक पवित्रा घेत अजून वेळ गेलेली नाही. चर्चा होऊ शकते असे म्हटले होते. दरम्यान, यापुढे बोलणी नाही, असा अंतिम निर्णय भाजपचा असल्याचे प्रदेशाध्य देवेंद्र फडणीवस यांनी म्हटले होते. त्यामुळे युती तुटल्याचे संकेत दिले होते. 

युतीबाबत पुन्हा एकदा शिवसेनेने आणखी एक पाऊल पुढे टाकत बोलणी करण्याबाबत अनुकुलता दाखविली आहे. त्यासाठी शिवसेनेच्यावतीने संजय राऊत, सुभाष देसाई हे ओमप्रकाश माथूर,राजीव प्रताप रुडी यांची भेट घेणार आहेत. दुपारी होणाऱ्या बैठकीत काय तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.