'महायुती'चा तिढा सुटला; घटकपक्षांचं 14 जागांवर समाधान

गेल्या कित्येक दिवसांपासून अडलेलं 'फॉर्म्युल्या'चं कोडं रात्री उशीरा का होईना पण सुटल्याची चिन्हं दिसू लागलीत. 

Updated: Sep 25, 2014, 09:05 AM IST
'महायुती'चा तिढा सुटला; घटकपक्षांचं 14 जागांवर समाधान title=

मुंबई : बुधवारी दिवसभरात महायुतीसंबंधीत घडामोडींचा वेग प्रचंड वाढला होता... तेवढाच तणावही नेत्यांमध्ये दिसून येत होता. गेल्या कित्येक दिवसांपासून अडलेलं 'फॉर्म्युल्या'चं कोडं रात्री उशीरा का होईना पण सुटल्याची चिन्हं दिसू लागलीत. शिवसेना नेते रामदास कदम, नीलम गोऱ्हे यांनी 'महायुती'चा पेच सुटल्याचं जाहीर केलंय. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषण करण्यात आलेली नाही. 

अपडेट रात्री 11.10 वाजता...

- तणाव निवळला, घटकपक्षांची नाराजी दूर

- मात्र, अधिकृत घोषणा नाही

- नव्या फॉर्म्युल्यावर एकमत

- शिवसेना - 151, भाजप - 123, घटकपक्ष - 14

- घटस्थापनेच्या मुहूर्तावर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

अपडेट रात्री 11.00 वाजता...

- जागावाटपाचा तिढा सुटला - नीलम गोऱ्हे

- अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे करणार - नीलम गोऱ्हे

- 'माध्यमांमुळे तणाव वाढतोय... महायुतीत तणाव नाही, चिंता आहे'

- हे खुर्च्यांचं भांडण नाही, तर कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न - नीलम गोऱ्हे

- घटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम

- शिवसेना 151 च्या खाली येणार नाही, यावर उद्धव ठाकरे, शिवसेना ठाम

- भाजपनं जागा सोडल्या... 14 जागांवर घटकपक्ष समाधानी - रामदास कदम

अपडेट रात्री 10.56 वाजता...

- 'महायुती'चा पेच सुटला - महादेव जानकर

- 14 जागांवर घटकपक्ष समाधानी

- मातोश्रीवरील बैठकरीनंतर जानकरांनी दिली माहिती

- महायुती होणार; जानकरांचा विश्वास

- शिवसेना - भाजपच्या जागा मात्र अजूनही गुलदस्त्यात

अपडेट रात्री 9.00 वाजता...

- महायुतीचा निर्णय आजच घ्या...

- अन्यथा उद्या आमचे उमेदवार अर्ज भरतील

- राजू शेट्टींचा इशारा

- हवं असलं तर आमच्या १८ मधून २-३ कमी करा – शेट्टी

- जानकर, शेट्टींचा नवा फॉर्म्युला शिवसेना -१५०, भाजप - १२५, घटक पक्ष - १३ 

अपडेट रात्री ८.०० वाजता 

- जागा वाटपाचं गुहाळ सुरूच

- महायुतीच्या जागावाटपला जानकर आणि शेट्टी वैतागले

- नाराजी नाट्य महायुतीत कायम

- महायुतीची दैयनिय अवस्था

- शिवसेनेच्या फॉर्म्युल्याच्या जवळ जाणारा घटक पक्षांचा फॉर्म्युला 

- घटक पक्षांचा नवा फॉर्म्युला शिवसेना१५०- भाजप १२०- घटकपक्ष १८ जागा

- युती तुटली तर रिपाइं शिवसेनेसोबत जाणार

- महायुतीचा निर्णय उद्या होणार 

संध्याकाळी ६.१७ वाजता 

- घटकपक्षांची पत्रकार परिषद रद्द

- मुंबई पत्रकार परिषद येथे होती पत्रकार परिषद 

- घटकपक्षांचे सर्व नेते भाजप/सेनेबरोबर चर्चा करतायेत

- बांद्रा येथील हॉटेल सोफिटेल मध्ये सुरु आहे बैठक 

- महादेव जाणकरांनी दिली माहिती

संध्याकाळी ६.०५ वाजता 

- आता आलाय नवा फॉर्म्युला - शिवसेना -१५०, भाजप - १२०, घटक पक्ष - १८

- राजू शेट्टींनी दिला नवा फॉर्म्युला, आता भाजप काय घेणार भूमिका, बैठक संपली

- शिवसेना भाजपच्या डोक्यात यशाची हवा गेली, त्यांचा अंदाज घ्यायला कमी पडलो, सेना-भाजपनं पाठित खंजीर खुपसला - राजू शेट्टी

संध्याकाळी ५.१५ वाजता 

- भाजपसोबत घटक पक्षांची बैठक सुरू

दुपारी ४.३५ वाजता 

- महायुतीच्या घटक पक्षांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

- शिवसेनेसोबत १८ जागांबद्दल बोललो आता भाजपकडे जाणार, १८ जागांबद्दल बोलणं झालं...

- भाजप नेत्यांची भेट घेतल्यानंतर निर्णय, संध्याकाळी सहा वाजता घेणार पत्रकार परिषद, राजू शेट्टींनी जाहीर केली भूमिका...

दुपारी ३.२० वाजता 

- ते लोकं सोडून जात असतील तर त्यांच्या ७ जागा मला द्या - आठवले

दुपारी १ वाजता 

- आमचा सर्वात मोठा अपमान- राजू शेट्टी

- आमचा आत्मसन्मान, स्वाभिमान दुखावला- राजू शेट्टी

- शिवसेनेच्या दारात जाणार नाही - शेट्टी

- महायुतीत महाफूट, संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन करणार उमेदवार जाहीर, राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांचा निर्णय

- संध्याकाळपर्यंत वाट पाहणार, नाहीतर स्वबळावर लढणार, आमचा अखेरचा निर्णय- शेट्टी, जानकर, मेटेंचा निर्णय

दुपारी १२.५५ वाजता

- आम्हाला शिवसेना, भाजपनं फसवलं- महादेव जानकर  

- घटक पक्षांचा महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा

- राजू शेट्टी, जानकर आणि विनायक मेटे आता शिवसेना नेत्यांच्या भेटीला

दुपारी १२.२० वाजता 

- ओम माथूर यांच्याकडे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू

दुपारी १२ वाजता 

- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मुंबई दौरा रद्द

सकाळी ११.५० वाजता

- आपली अंतिम भूमिका जाहीर करण्यासाठी महादेव जानकर आणि राजू शेट्टींची संध्याकाळी ६ वाजता पत्रकार परिषद

सकाळी ११.३० वाजता

- घटक पक्षांवर अन्याय होऊ देणार नाही, सोबतच घेणार, याचा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. आमदार निवास इथं विनायक मेटे, राजू शेट्टींसोबत फडणवीसांची बैठक सुरू आहे.  

सकाळी ११ वाजता 

- महायुतीतील घटक पक्षांची बैठक सुरू... मॅजेस्टिक आमदार निवास इथं राजू शेट्टी आणि विनायक मेटे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक सुरू झालीय. थोड्याच वेळात रामदास आठवले आणि महादेव जानकरही बैठकीला पोहोचतायेत.

 

मुंबई: महायुती उभी फुट पडलीये. जागावाटपावरून काल रात्री झालेली महायुतीची बैठक वादळी ठरली. या बैठकीत सेना भाजपनं घटकपक्षांसमोर ठेवलेला 151-130-7 चा फॉर्म्युला धूडकावून लावला.

आम्ही डिमांडर नाहीत कमांडर आहोत, असं म्हणत आता घटक पक्षांनीच सेना-भाजसमोर नवा फॉर्म्युला ठेवलाय. आम्हाला एकही जागा नको शिवसेना-भाजपनं 288 जागा लढवाव्यात मात्र रिपाइं आणि राष्ट्रीय समाज पक्षाला अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद द्यावं, अशी जोरदार मागणी त्यांनी सेना-भाजपकडे केलीये. हे शक्य होत नसेल तर आम्ही 288 जागा लढवू तुम्हाला हव्या असलेल्या जागांची मागणी घेऊन तुम्ही आमच्याकडे या असा फॉर्म्युला घटक पक्षांनी सेना भाजपुढे ठेवलाय.

हा नवा फॉर्म्यूला ठेवल्यानंतर राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रामदास आठवले, महादेव जानकर बैठक अर्धवट सोडून निघून गेले. मात्र रामदास आठवले थेट घरीच निघून गेले. तर राजू शेट्टी आणि महादेव जानकर हे बैठकीत पुन्हा सहभागी झाले. मात्र आता घटकपक्षांनी टोकाची भूमिका घेत महायुती केवळ चार घटक पक्षांची मिळून असेल असा नवा प्रस्ताव सेना-भाजपसमोर ठेवलाय.

तब्बल तीन तास चाललेली ही बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली असून आज पुन्हा घटकपक्षांसोबत पुन्हा चर्चा होईल असं शिवसेना-भाजपकडून सांगण्यात आलंय.

दरम्यान, एका कार्यक्रमासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत येणार आहेत. त्यामुळं त्यांच्या येण्यानं महायुतीला काही फायदा होतो का? हे कळेलच.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.